पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'१६

ज्जनगड व समर्थ रामदास.

शिरणाराकडे तोंड करून बसविलेला आहे. पायऱ्यांवर पादत्राण वगैरे काढून ठेवून आम्हीं सभामंडपांतून वर देवाकडे गेलों. सभामंडपाचें काम लांकडी आहे, मात्र खालीं पांढऱ्या - काळ्या अलीकडील संगमरवरी विटांची फरशी केलेली आहे. राममंदिर बरेंच जुनें दिसतें. त्याच्या सभों- वार मोठमोठ्या मुसलमानी पद्धतीच्या कमानी असून त्या कमानींवर बुमट केलेला आहे. आंत गाभारा आहे व त्यांत राम, लक्ष्मण, सीता, मारुती व रामदास अशा पांच मूर्ति आहेत. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूकडून गाभा- याचे खाली भुयारांत जाण्यास अगदी काळोखाचा वांकडा जिना आहे. त्यांतून आह्मीं खालीं गेलों. तेथे गाभान्याचे खालीं रामदासस्वामींची समाधि आहे. त्यावर फुलांच्या माळा घातलेल्या दिसल्या. समाधीच्या पलीकडे भिंतींत कोनाड्यांत त्यांच्या पितळी पादुका आहेत. हें सर्व पाहून झाल्यावर आम्ही समोरून पण तळघरवजा गाभाऱ्याचे पुढील प्रशस्त दालनांतून पायऱ्या चढून सभामंडपाशीं आलों.
 राममंदिर व रामदासस्वामींची ही समाधि थेट उत्तर हिंदुस्थानांतील मुसलमानी कबरस्थानाप्रमाणेंच आहे. म्हणजे कबरस्थान खालीं तळघर- वजा बांधलेल्या भागांत असावयाचें व वर आणखी कबरस्थानाचा आकार असावयाचा; त्याऐवजीं येथें राममूर्ति आहेत. यावरून जुन्नरच्या लेण्याद्रि- प्रमाणें हें राममंदिर मूळचें कबरस्थान असून त्याच्याच अवशेष भागावर हें मंदिर बांधलेलें आहे कीं काय असा भास होतो. कदाचित् त्याच धर्तीवर ही समाधि बांधली असेल. राममंदिराचे शिखर चुन्याविटांचे असून त्यावर उत्तम गिलावा करून जागोजाग चित्रें केलेलीं आहेत. एक- दर देऊळ, त्याच्या समोवारचें पटांगण व त्याचें शिखर याचें काम फार सुबक आहे, यामुळें हैं ठिकाण पाहून मनाला आनंद होतो व रामदा साच्या शिष्यांनी रामदासासारख्या विख्यात स्वामीला साजेशीच समाधि व मंदिर बांधलें आहे असें वाटल्याखेरीज रहात नाहीं. समाधियुक्त मंदिर पाहिल्यावर आम्हीं देवळाशेजारी असलेल्या सोप्यावजा लांकडी इमारतीत गेलों. तेथे देवळाचे पुजारी वगैरे रहातात. `याच घरांत रामदासस्वामी रहात असत असें आम्हांस सांगण्यांत आलें. आम्हीं समर्थांची निजाव-