पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

१५


नीच्या वरच परशियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे. पण या किंवा किल्ल्यांत असलेल्या आणखी एकदोन शिलालेखांचें भाषांतर अझून झालेलें नाहीं. निदान पुष्कळ चौकशी करूनसुद्धां तें मला कोठेंही मिळालें नाहीं. परशियन जाणणाऱ्या वाचकांचें याकडे लक्ष जाईल काय ?
 दरवाज्याच्या खालपासून अगदीं दुसऱ्या दरवाज्याच्या वरपर्यंत चांगल्या दगडी बांधीव पायच्या आहेत. पहिल्या दरवाज्यांतून जरासं वर गेलें म्हणजे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा चांगला मजबूत आहे. याच्या देवडीच्या आंत गेल्यावर उजव्या हाताच्या भिंतींत एक परशियन शिलालेख आहे. येथल्या पायऱ्या चढून वर गेलें कीं, किल्ल्याच्या सपा- टीवरच मनुष्य येतो. येथे जवळच डाव्या हाताला एक लहानशी मुसल- मानी कबर लागते व उजव्या हाताला एक लहानसा तलाव लागतो. याला दगडी पायऱ्या आहेत व हा अगदी अलीकडे बांधलेला - निदान दुरुस्त केलेला आहे असें तेथल्या संगमरवरी शिलालेखावरून दिसून येतें.
  हा किल्ला फार मोठा नाहीं; त्याची रुंदी तर फारच थोडी आहे. एकंदर घेर पंचावनशे फुटांच्या वर नाहीं. तलाव व कबर टाकून जरा पुढें गेलें ह्मणजे डाव्या हाताला राहण्याचीं घरें लागतात व उजव्या हाताला पहिल्यापेक्षांही मोठा तलाव लागतो. हा तलाव चांगल्या बांधकामाचा असून त्याला तीहींकडून आंत जाण्यास चांगल्या घाटवजा पायन्या बांधल्या आहेत. एका लहानशा खोपटांत तलावांतून तोटी लावून पंपानें राणी नेण्याची व्यवस्था केली आहे. येथें ही अर्वाचीन यांत्रिक सुधारणा शिरली आहे असें पाहून मला आश्चर्य वाटलें !
 पुढें राममंदिराच्या फरशी केलेल्या पटांगणांत शिरतों तों तेथें फूट- बॉलचा डाव चालू होता. हा प्रकार पाहून तर आमचें आश्चर्य दुणावलें ! काय अर्वाचीन पाश्चात्य सुधारणेचा व पाश्चात्त्य संस्थांचा जोर आहे पहा ! श्रीसमर्थ रामदासाच्या वसतिस्थानांतसुद्धां इंग्रजी फुटबॉलनें प्रवेश केला ना १ यावरून अर्वाचीन सुधारणेच्या अप्रतिहत गतीची चांगली कल्पना माझे मनांत आली. नंतर आम्ही राममंदिराच्या सभामंडपाचे पाय-यांशीं आलों. येथें एक जुना गणपति मंदिराकडे पाठ करून पण मंदिरांत