पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
सज्जनगड व समर्थ रामदास

.


गडाच्या किल्ल्यावर येऊन पोचलों व पुण्याहून सज्जनगडाची आमची पायगाडीची सफर एकदांची संपली; असें मनांत येऊन मनाला एक प्रकारें आनंद झाला.

हावळेश्वरच्या सह्याद्रीच्या मुख्य डोंगराच्या ओळी- पासून ज्या पुष्कळ पोटओळी सातारा जिल्ह्यांत पस- रल्या आहेत; त्यांपैकी एका विस्कळीत ओळींमधील एका स्वतंत्र सुळक्यावर परळीचा किल्ला बांधलेला आहे. सातारच्या आसपासच्या भागाला, सातारचा अजिमतारा व परळीचा नौरसतारा ( हीं दोन्ही नांवें औरंगझेबाने दिलेलीं आहेत हें पुढें या लेखाच्या ऐतिहासिक भागांत येईल ) हे जयविजयासारखे आहेत. साता- रचा अजिमतारा परळीच्या नौरसताऱ्यापेक्षां उंचीनें, मजबुतीनें व विस्ता- रानें जरा मोठा आहे. सातारचा किल्ला समुद्रसपाटीपासून ३३०० फूट आहे तर परळीचा किल्ला ३०२० फूट उंच आहे. परळीच्या किल्ल्याला दोन वाटा आहेत; एक परळी गांवाच्या अलीकडून उरमोडी नदी ओलांडल्याबरोबर सरळ वर जाते व दुसरी परळी गांवांतून जाते. मी दोनदां परळी पाहिली व दोन्ही वेळां निरनिराळ्या मार्गाने गेलों. दुसऱ्या खेपेस परळी गांवांतील देवळें पाहिलीं त्याची हकीकत पुढें दिली आहे. साताऱ्याकडून जाणान्यास हा दुसरा रस्ता दोन मैलांनीं अधिक लांब पडतो. कारण एका टेकडीला वळसा घालून परळी गांवामधून जावें लागतें. हा रस्ता पहिल्यापेक्षां जास्त विकट आहे. पण किल्ल्याच्या दवा- ज्याखाली दोन्ही रस्ते एके ठिकाणींच मिळतात. किल्ल्याच्या दरवाजाशीं येईपर्यंत किल्ल्याचा दरवाजा अगदी दिसत नाहीं. कारण दरवाज्याचें तोंड पूर्वेस आहे व मनुष्य जरा बाजूनें चढतो. शिवाय दरवाजाच्या वर तुटलेला कडा आलेला आहे. पहिला दरवाजा उत्तम दगडांनी बांधलेला आहे व त्याचे बाजूस बुरूज असून ते मजबूत आहेत. दरवाज्याच्या कमा-?