पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

१३.


येऊन ते उरमोडी या नदीला जाऊन मिळाले आहेत.परळीच्या मैल दीड मैल अलीकडे उरमोडी नदी लागते.या नदीलाअगदी अरुंदअसा लांकडी साकू बांधलेला आहे. त्यावरून पायगाडी जेमतेम आह्नीं नेली. पुढे हा रस्ता परळी गांवाकडे जातो. परळी किल्ल्यास जाण्या- करितां हा रस्ता टाकून अर्धा एक मैल अगदीं खांचखळग्याच्या पाऊल- वाटेनेंच जावें लागतें, यामुळे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीशीं येईतों पांच वाजून गेले होते. तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यांत आह्नीं आपल्या पायगाड्या ठेवल्या व किल्ला चढण्यास लागलो. प्रथम एक लहानशी टेकडी चढून गेल्यावर किल्ल्याचा सुळकाच्या सुळका लागतो. हा किल्ला फार मोठा नाहीं. पण किल्ल्याच्या सभोवारचे काळे- कभिन्न खडकच अगर्दी भिंतीसारखे तुटलेले आहेत. पूर्वी या किल्ल्याला जाण्यास चांगल्या पायऱ्या असाव्यात असें वाटतें. कारण, पायन्यांच्या खुणा सारख्या दिसत होत्या. या परळीच्या किल्ल्याची वाट व पायथ्या- पर्यंतची वाट या पाहून मला देहूच्या वाटेची आठवण झाली. देहूची तीनचार मैलांची वाट अशीच अगदीं वाईट आहे. या दोन्ही ठिकाणीं मोठमोठ्या यात्रा जमतात. परळीला दासनवमीस सात हजारपर्यंत यात्रा जमते, असें मला समजलें. शिवाय सातान्याहून सज्जनगडास वारंवार जाणारे लोक पुष्कळ असतात. असे असून या वाटेची इतकी वाईट स्थिति कां ? लोकलफंडाकडून या यात्रेकरूंनी चांगली वाट करण्याबद्दल दाद लावून घेऊं नये काय, असें माझ्या मनांत आलें. निदान किल्ल्याची वाट तरी चांगली कां नसावी ? रामदासांच्या समाधीचें ठिकाण हैं. राम- दासांच्या वडीलबंधूंचे वंशज हयात असून महाराष्ट्रांतले पहिल्या प्रतीचे सरदार आहेत. चाफळकरांना मोठी जहागीर आहे. शिवाय रामदासी पंथाची शिष्यशाखाही मोठी आहे. तेव्हां या सरदारांनीं किंवा त्यांच्या शिष्यांपैकीं संपन्न गृहस्थांनी किल्ल्याचा रस्ता दुरुस्त करून लोकांना चढतांना सुखदायक होईल असा कां करूं नये? अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनांत वारंवार येत होते, इतकी या सर्व रस्त्याची वाईट स्थिति होती. शेवटीं सहा साडे सहाच्या सुमारास आह्मीं एकदांचे सज्जन-