Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

सज्जनगड व समर्थ रामदास.

मुळें आह्मांस गांवातून चालतच जावें लागलें. 'आमच्या मित्राच्या घरीं आह्मीं सुखरूप येऊन पायगाडीनें आलों, हें पाहून माझ्या मित्राच्याशेवटीं बाराच्या सुमारास पोंचलों आहीं पुण्याहून मंडळींना साश्चर्य आनंद वाटला.
 रात्रीं आह्मीं आमच्या मित्राचें पुनर्विवाह या सामाजिक विषया- वरील नाटक पहावयास गेलों. साता-यासारख्या शहरीं पुनर्विवाहासारख्या सामाजिक विषयावरील एका कर्त्या सुधारकानें लिहिलेले नाटक पाहण्यास पुष्कळ प्रेक्षक जमावे हें स्वाभाविक होतें. मंडळीनें एकंदरींत प्रयोग चांगल्या प्रकारें केला, यांत संशय नाहीं. मात्र नाटक मोठे असल्यामुळे प्रयोग संपण्यास रात्रींचे तीन वाजले.
 दुसरे दिवशीं आह्मांला उठण्यास उशीर झाला व सज्जनगडास दोन प्रहरनंतर जाण्याचे ठरलें. या वेळीं माझ्याबरोबर चारजण आणखी पाय- गाडीवाले होते. साताऱ्याहून सजनगड सहासात मैल आहे. तेव्हां चार वाजतां निघून सात साडेसात वाजतां आह्मीं सहज परत येऊ, असा आमचा अंदाज होता. सातारा शहर हैं किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, हें वर लिहिलेच आहे. पण हा किल्ल्याचा डोंगर म्हणजे एकटाच सुळका नाहीं, तर ही एक पूर्वपश्चिम जाणारी डोंगराची रांगच आहे व या रांगेत एकीकडे सातारचा किल्ला आहे व दुसरीकडे यवतेश्वराचा डोंगर आहे व सातारच्या किल्ल्यावरून यवतेश्वराच्या डोंगरावरून डोंग- रांच्या पठारापठारानें महाबळेश्वरापर्यंत पायवाट जाते. सातारचा किल्ला व यवतेश्वराचा डोंगर यांचेमध्यें डोंगरांची रांग सखल असून खिंडीसारखी तुटली आहे व या खिंडीचे खालीं लहानसा बोगदा केलेला आहे व पुणे-कोल्हापूर रस्ता या बोगद्यांतूनच गेला आहे. बोगद्याच्या डाव्या हातास कोल्हापुरचा रस्ता वळतो व उजव्या हातास सज्जनगडाचा रस्ता फुटतो. साता-याशेजारचा बोगदा टाकल्यावर मात्र मैल दीड मैल खूब उतार लागतो; व येथपर्यंतच रस्ता चांगला खडीचा आहे. पुढला रस्ता नुसत्या मुरमाचा आहे, व त्याला भयंकर चढउतार आहेत. कारण, उजव्या हाताच्या यवतेश्वराच्या डोंगरांतून कितीतरी ओढेनाले खाली