पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

११.


सुकूल नांवाचें गांव लागलें. हें गांव बरेंच मोठे आहे व येथूनच वाईकडे उजव्या बाजूस वाट फुटते. वाई येथून फक्त ८ मैल आहे. आतां . आझांला पुढे एकवीस मैल जावयाचें होतें व नऊ तर वाजून गेले होते... तेव्हां साताऱ्यास पोंचण्यास अकरा साडेअकरा वाजणार असें वाटलें. हा प्रांत बराच सपाटीचा आहे. यामुळे आमचा प्रवास जोरानें चालला होता. पन्नास मैलांनंतर वाठारकडून वाईला जाणारा रस्ता आहझाला लागला. येथूनहि वांई आठच मैल आहे. पुढे एकदां साता-याकडून वाईचा रस्ता लागला तेथूनहि वाई आठच मैल आहे. यावरून पुणे- सातारा रस्ता या ठिकाणीं कांहींसा वर्तुलाकार असावा म्हणून वाई या तिन्ही रस्त्यांपासून आठच मैल आहे.
 पुण्यापासून छपन्न मैलांशीं भुंजगांवाजवळ कृष्णा नदीवरील पूल लागला. या ठिकाणीं नदी फारशी मोठी नाहीं. नीरेच्या पुलापेक्षां हा पूल बराच लहान आहे. सातारारोड स्टेशनापासून साताऱ्यास येतांना कृष्णेवर जेवढा पूल आहे, तेवढाहि हा पूल नाहीं. यामुळें प्रथमतः हा पूल कृष्णेवरचा आहे हें ध्यानांतहि येत नाहीं. येथून पुढे एकसष्टमैलांजवळ असलेल्या लिंबगांवच्या खिंडीपर्यंत चढावाचा रस्ता आहे. आतां ऊनहि झाले होते यामुळे प्रवासाचा फारच त्रास झाला. तहानहि फार लागू लागली. मग वाटेंत एका ठिकाणीं चांगलीं पिकलेली केळीं घेतली व तीं खाल्लीं. त्यामुळे जरा बरें वाटलें. ही लिंबची खिंड' व येथला एकंदर देखावा पुणे-लोणावळें रस्त्यावरील वडगांवच्या खिंडी- सारखा दिसतो. लिंबच्या खिंडीच्या माथ्यावर कसेबसे आह्मीं आलों व तेथून पुन्हां जी उतारास सुरुवात झाली ती आह्मांस वेण्या नदीच्या पुलापर्यंत पुरली. वेण्येचा पूल पुण्याहून सदुसष्टाव्या मैलाजवळ आहे.. आतां सातारा दोन अडीच भैलच राहिला. एकदांचे मुक्कामाला आलों, असे आह्मांस वाटूं लागलें. पण सातारा उंचावर असल्यामुळे या दोन अडीच मैलांला वाजवीपेक्षां जास्त वेळ लागला. तरी शेवटीं एकदांचेपोंचलों व गांवच्या सातारा गांवाकडे जाणाऱ्या रस्त्याशीं आतीं येऊन रस्त्याला लागलों. गांव चढत्या किल्ल्याच्या बाजूवरच बसलेला असल्या-