पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कन्हऱ्हाड प्रांती- च्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयों आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत ह्मणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें. F अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ त सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत .लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानां- सकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजा- च्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब. पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासां- .च्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदर- बुद्धि वसत होती हैं व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.