पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १.१६ मचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या च रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या. केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व ॥ १ शके १५९४ ( सन १६७२ ) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव ' परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. च केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों अ म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र चद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे च उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनु ग्रह झाला असला पाहिजे. ( या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व राम- दासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं राम- दासांचें वय चौसष्ट वर्षीचें होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदरा- चा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते. शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा