पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. · शिवाजी व रामदास यांच्या पश्चात् दिवाकर गोसावी हा रामदासांच्या . दोन्ही मठांची व्यवस्था पहात होता. त्याच्या वृद्धापकाळानंतर त्यांचा मुलगा बाहिरंभट हा कारभार पाहूं लागला. त्या वृद्धापकाळी लिहिलेली दोन पत्रे परिशिष्टांत छापलीं आहेत. त्या दोन्ही पत्रांत शिवाजीच्या प्रथम भेटीच्या सालाचा उल्लेख आहे. परिधावीनाम संवत्सरी शिवाजी महाराजांस राम- दासांनीं परमार्थ सांगून अनुग्रह केला; तेव्हांपासून आपल्याकडे संस्थानचा कारभार रामदासस्वामींनी दिला आहे, याची आठवण सर्वास देण्यास पहिल्या पत्रांत आपल्या मुलाला लिहिले आहे व दुसऱ्या पत्रांत तीच आठवण देऊन आपल्या पश्चात् हा कारभार आपल्या मुलाकडे ठेवावा अशाबद्दल शिष्यवृंदाला दिवाकर गोसाव्यांनीं विनंति केली आहे. हीं दोन्हीं पत्र केशव गोसाव्याच्या पत्रांतील भेटीच्या कालाचा प्रत्यंतर पुरावा होत यांत शंका नाहीं. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, रा. चांदोरकर यांना अचानकपणे सांपडलेल्या कागदपत्रांनी रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या वादग्रस्त प्रश्नाचा कायमचा व समाधानकारक रीतीनें निकाल लागतो. या पत्रव्यवहारानें रामदासांच्या अंधुक चरित्रावर इतका उत्तम प्रकाश पडतो कीं, तें चरित्र ढळढळीत डोळ्यापुढे दिसूं लागतें. मात्र अंधश्रद्धा किंवा पूर्वग्रह यांची डोळ्यांवर आलेली झापडें दूर सारून डोळे उघडून त्या प्रकाशाच्या साहाय्यानें रामदासचरित्राकडे पाहिले पाहिजे. पण झापडें न काढण्याचा हट्ट धरल्यास कितीही प्रकाश पडला तरी त्याचा काय उपयोग होणार ! आतां रामदास शिवाजीचे राजकारण गुरू होते किंवा मोक्षगुरु होते हा वादग्रस्त प्रश्न राहिला. व त्याचा निकालही सहज करतां येतो. शिवा- जीच्या आयुष्यांतील राज्यस्थापनेचें जें मुख्य काम तें बहुतेक संपेपर्यंत जर शिवाजीची व रामदासांची भेटंच मुळी झाली नव्हती तर रामदासानें शिवाजीस राज्यस्थापनेला स्फूर्ति दिली व रामदास शिवाजीस राजकार- णांत सल्लामसलत देत असे हे म्हणणें फोलच होतें. तेव्हां रामदास शिवाजीचे मोक्षगुरु किंवा धर्मगुरु होते असेच म्हणणे प्राप्त आहे. अर्थात्