Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४
सज्जनगड व समर्थ रामदास.

जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं 'या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे.
 पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-