पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ११३ होतो परंतु माझी प्रकृति फार बिघडली येणें होत नाहीं मी इकडून अकास येणेसाठी लिहिले परंतु अकाचेही येणे व्हावयाचे नाही गावी भानजी गोसावी तेथे असतील राजे यांची पहिलीच भेट आहे वार्डाचे लोकास खटपटेस अणावे उपयोग होईल झाडी बहुत आहे इकडून उद ईक चिक गो। व विट्टल गो। व दत्तात्रय गो। उदइक पाठउन देतो श्रीचे उत्सवास भीक्षेचे धान्य जे मिळाले ते अश्वत्थ भट मसुरकर या समागमे पाठविले दत्ताजीपंताकडु x (न) दोनशे होनु उत्सावास पाठ- विले ते अले असतील लोभ करावा मीती चैत्र व|| १ शके १५९४ हैं विज्ञप्ति. (४ एप्रिल बुधवार १६७२.) हैं पत्र या लेखकानें दोनतीन वेळां लक्षपूर्वक पाहिले आहे. तें अस्सल पत्र आहे यांत शंका नाहीं. त्या पत्रावरील शक अगदीं स्पष्ट आहे. देव नवांच्या आंकड्याबद्दल संशय व्यक्त करतात. पण त्यांत मुळींच हंशील नाहीं. नऊ मोडी लिहितांना एक टांकी लिहितात तसा हा नवांचा आंकडा न लिहितां पूज्य काढून त्याला नवांचा रफार जोडला आहे इतकाच फरक आहे. पण अशा त-हेची नऊ काढण्याची रीत या लेखकानें कित्येक पत्रांत पाहिली आहे. तेव्हां या पत्रासंबंधी असले कुतर्क व्यर्थ आहेत. या पत्रांतील अर्थही स्पष्ट व सरळ आहे. शिवाजीराजे भोसले हे रामदासास प्रथमच भेटावयाचे असल्यामुळे दिवाकर गोसाव्याने सर्व शिष्यमंडळीस त्या समारंभास आग्रहानें बोलावावें हें रास्त आहे. केशवगोसावी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपणाला व आकास येण्यास होत नाहीं असे लिहितात. दुसऱ्या शिष्यास पाठवून देण्याचेंही लिहितात, व शिवराजाची ही समर्थांशी पहिली भेट असल्यामुळे गांवकरी बोलावून सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेची करण्यास दिवाकर गोसा- व्यास सांगतात. शिवाय ज्याप्रमाणें दिवाकर गोसाव्याचे समर्थांच्या एकांत- वासाबद्दलच्या पत्राचा व भास्कर गोसाव्याच्या पत्राचा मेळ बसतो त्याच- प्रमाणें या केशव गोसाव्याच्या पत्राचा भास्कर गोसाव्याच्या पत्राशीं पूर्ण मेळ बसतो. कारण शिवाजीनें रामदासाबद्दलच्या व मठाबद्दलच्या भास्कर गोसाव्याच्या तोंडी हकीकतीवरून दर वर्षास दोनशें होन देण्याची स...८