पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ सज्जनगड व समर्थ रामदास. हीच उपपत्ति या लेखकास पटते. उपदेशभेदाचा व त्याच्या उपपत्तीचा विषय हा अमूर्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कागदोपत्रीं पुरावा सांपडणें अशक्य आहे. असो. रामदास चाफळास परत आले, तो काळ शिवाजीच्या आयुष्यांतील अत्यंत आणीबाणीचा व अत्यंत संकटाचा होता. औरंगजेब बादशहानें शिवाजीचा बीमोड करण्याकरितां भगीरथ प्रयत्न सुरू केले होते व त्या वेळी शिवाजीला माघार खाऊन औरंगजेबाशीं तह करून दिल्लीस जावें लागलें. दिल्लीहून सुटका होऊन देशीं परत येण्यास शिवाजीस २॥२॥ वर्षे लागलीं. परत आल्यावर शिवाजीनें गेलेलें राज्य पुन्हां परत मिळ- विण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याच्या प्रयत्नाला यशही आलें. पण या धांदलीच्या गडबडीच्या व मानसिक अस्वस्थतेच्या काळीं रामदासांची हकीगत सन १६५८ सालीं कानांवर गेली असतांना रामदासांस भेटावयास शिवाजी महाराजांस सवड झाली नसावी हैं उघड आहे. पण १६७२ मध्ये शिवाजी सातारा व कन्हऱ्हाड या प्रांतांत येऊन हा मुलुख त्याच्या ताव्यांत आला तेव्हां रामदासांची भेट घ्यावी अशी त्यालाही इच्छा झाली असावी व शिवाजी आता आपल्या मठाच्या आसपास आलेला आहे असें पाहून रामदासांनींही बखरींतील प्रसिद्ध पत्र शिवाजीस पाठ- विले असावें. कारण १६७२ या सालीं या पत्रांत दिलेली सर्व विशेषणें व शिवाजीचा केलेला गौरव व विशेषतः 'नृपवर तुच्छ केले' हे म्हणणें योग्य होतें. तेव्हां रामदासांचें असें पत्र आल्यावर शिवाजीनें रामदासांस भेटण्याचा निश्चय केला; ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास केशव गोसाव्यांनीं लिहिलेल्या खालील पंत्रावरून स्पष्ट होतें. श्रीराम श्रीरामदासस्वामी. श्रीगुरुभक्तपरायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसाबी यासी प्रतिपूर्वक के + (श ) व गोसावि नमस्कार उपरि येथील कुशल + (आ) पण पत्र पाठविले ते पावले मजकूर समजला राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले मी येणार