पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १११ रा. देव या पत्रांत व्यंग्यार्थ काढतात ! त्यांचे म्हणणें हें कीं, शिवाजीनें भास्कर गोसाव्यास जे रामदासांसंबंधी अनोळख्यासारखे प्रश्न विचारले ते भास्कर गोसाव्याची परीक्षा पाहण्याकरितां व जाणून बुजून खोटे विचारले. पण या पत्राचा असा अर्थ करण्यापासून किती विपरीत कल्पना मानाव्या लागतात ? शिवाजी महाराजांची व रामदासांची भेट सन १६४९ मध्यें झाली होती असे धरलें तर १६४९ पासून १६५८ म्हणजे नऊ वर्षेपर्यंत शिवाजीनें या मठास कांहींच मदत केली नाहीं असें होतें. कारण अशी मदत चालू असती तर ती भिक्षा मागावयास जाणाऱ्या शिष्यास अवश्य ठाऊक असती, व हें ठाऊक असतां, तो शिष्य शिवाजीकडे भिक्षा माग- ण्यास गेला असता कसा ? शिवाय दुसराही एक असंभवनीय प्रकार या व्यंग्याथीवरून निघतो. शिवाजी प्रत्यक्ष रामदासाला भेटल्यावर व त्याज- पासून अनुग्रह घेतल्यावर मठास कांहीं नेमणूक करून देत नाहीं व मास्कर गोसाव्या सारख्या शिष्याच्या तोंडी माहितीवरून वार्षिक दोनशें होनांची भिक्षा देतो, हें किती विचित्र वर्तन आहे ! यावरून रामदासां पेक्षां भास्कर गोसावीच जास्त अलौकिक कर्तबगारीचा पुरुष दिसतो ! सारांश, हा व्यंग्यार्थाचा खटाटोप बुडत्या माणसानें काडीचा आश्रय कर ण्यासारखा आहे. या पत्रावरून भेटीचा सांप्रदायिक कालनिर्णय पार ढांसळतो हैं उघड आहे व ह्मणून व्यंग्यार्थाचा व्यर्थ खटाटोप सांप्रदायिक काळाच्या पुर स्कर्त्यांना करावा लागतो. सन १६६४ मध्ये ग्रंथ समाप्त करून रामदास परत चाफळी आले त्या वेळी किंवा शिष्यांच्या सांगीवरून आर्धीसुद्धां त्यांना शिवाजीच्या दोनशे होनांच्या नेमणुकीची हकीगत कळली असली पाहिजे. तेव्हांपासूनच रामदासांचें लक्ष शिवाजीच्या चरित्राकडे, त्याच्या उद्योगाकडे व त्याच्या उद्योगानें लोकांच्या स्थितीत पडलेल्या फरकाकडे लागले असावें. या गोष्टीकडे एकदां लक्ष लागल्यापासून त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीला व्यावहारिक व राजकारणी दृष्टीची जोड झाली असावी व त्या दृष्टीची छटा त्यांच्या पुढील कवनांत उमटली असावी. दासबोधांतील उपदेशभेदाची