पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० सज्जनगड व समर्थ रामदास. भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि वरावर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी ** रिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसम- र्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळ गांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज़ा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वानिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते होस येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. ( १३ फेब्रुवारी रविवार १६५८.) हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्रार्शी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांत- वासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व ह्मणून भेटी- चा सांप्रदायिक काल खोटा ठरतो. या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागद- पत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं. या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे. पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो हाणून रा. राजवाडे व