Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.सज्जनगड व समर्थ रामदास १०९ चिमणाबाई अका व अनंत कवी यास बराबर घेऊन एकांत स्थानि शिव- थरचे घळीत जाउन बसले तुम्ही श्री महालेश्वरचे देवालयाचे काम चांगले रीतीनें करवावे भास्कर गो। आले म्हणजे मी येक दीवसाचे अवकाशे येतो कळावे मिति मार्गशीर्ष वद्य ५ शके १५७६ लोभ करावा हे आसीर्वाद. ( १८ डिसेंबर १६५४ सोमवार. ) हें पत्र सन १६५४ सालांत लिहिलेले आहे. समर्थ दहा वर्षे चाफळीं येणार नाहींत व मठाची व देवस्थानाची व्यवस्था त्यानीं शिष्यांवर व विशेषतः दिवाकर गोसाव्यावर सोपविली होती; या काळीं मठाचा खर्च निवळ भिक्षेवर चालू होता; त्याला कांहीं इनाम किंवा नेम-: णूक नव्हती या गोष्टी निर्विवाद सिद्ध होतात. यावरून रामदास सन १६५४ पासून १६६४ पर्यंत ग्रंथ लिहिण्यांत गुंतले होते असे सिद्ध होतें. व या दिवाकर गोसाव्याच्या पत्राला प्रत्यंतर पुरावा दासबोधांत आहे. कारण सन १६५९ मध्ये म्हणजे ग्रंथ लिहिण्यास एकांतांत राह- ण्यास गेल्यावर चार वर्षांनी सहाव्या दशकापर्यंत ग्रंथ आला होता; ही गोष्ट मागें दाखविली आहे. दहा वर्षीत रामदास केव्हांही बाहेर गेले नसतील असें नाहीं. तेव्हां जरी पुढें मागें रामदास दुसरीकडे होते अशा आशयाचें पत्र पुढे आले तरी त्यानें दिवाकर गोसाव्याच्या या पत्रांतील मजकूर खोटा ठरणार नाहीं. कारण दिवाकर गोसाव्याच्या पत्राचा अर्थ इतकाच कीं, मठाकडे व त्याचे व्यवस्थेकडे ग्रंथ पुरा होईपर्यंत लक्ष द्यावयाचें नाहीं, असें राम- दासांनी ठरविलें होतें. अर्थात् रामदासांच्या या एकांतवासाचे काळांत मठाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी शिष्यमंडळीवर पडली व त्याकरितां शिष्यमंडळी त्या प्रांतांत फिरून भिक्षेवर मठाचा खर्च चालवीत असत. ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास आलेल्या भास्कर गोसाव्याच्या पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते. श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रीया विराजित दिवाकर गोसावि या प्रती भास्कर गोसावि नमस्कार विनंती उपरि श्रीचे उछाहा होनु पनास