पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ सज्जनगड व समर्थ रामदास. देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली. या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं. रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे. या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गड- वडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात. श्री. चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु|| चाफल अनेक आसीर्वाद. तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व महळीस आज़ा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो || व