पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १०७ पुन्हां आपले कागदपत्र बाहेर जाऊं नयेत ह्मणून आमचे कारकुनाचे वृद्ध वडिलांनी याप्रमाणें ते बंदोबस्तांत ठेविले. आमचे कारकुनाचे मातोश्रीस वाईट वाटूं नये ह्मणून अशा गुप्त रीतीनें ते कागदपत्र देण्यास ते गृहस्थ तयार आहेत." अर्थात् ठरल्याप्रमाणें चांदोरकरांनीं रातोरात तो कागद- पत्रांचा संग्रह घेऊन ते धुळ्यास परत आले. या संग्रहांत दोनअडीचशें कागदपत्रे आहेत. मालेगांवचे उपाध्ये हे रामदासस्वामींच्या हयातीपासून व त्यांचे पश्चात् चाफळ व सज्जनगड या मठांची व्यवस्था पाहणारे दिवाकर गोसावी यांचे वंशज होत. तेव्हां या कागदांच्या अस्सलपणा- बद्दल शंका घेण्याचे कारण नाहीं. या लेखकानें हे अस्सल कागदपत्र स्वतः काळजीपूर्वक पाहिले आहेत व या कागदपत्रांत कोठेंही मागाहून दुरुस्त्या किंवा संशयास्पद आकडे वगैरे नाहींत; कागदपत्रांतील मजकूर स्पष्ट व सुवाच्य आहे. या कागदपत्रांवरून या वादावर कसा प्रकाश पडतो तें पाहू. प्रकृत विषयास लागू अशीं पत्र दिवाकर गोसावी यांना त्यांच्या आतांकडून किंवा शिष्यशाखेतील बंधुवर्गाकडून आलेली किंवा त्यांनीं दुसऱ्यांस पाठविलेलीं आहेत. या पत्रांवरून रामदासांनीं दिवाकर गोसावी यांस आपल्या हयातीत चाफळ संस्थानची सर्व व्यवस्था करण्यास व राजदरबारचें काम करण्यास अधिकार दिला होता व आपल्या पश्चात्ही हा अधिकार त्यांजकडे असावा अशी समर्थांची आज्ञा होती असे दिसते. पण रामदासांच्या पश्चात् उद्धव गोसावी यांना आपल्या हातांत सत्ता असावी अशी महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन उद्धव गोसावी व दिवाकर गोसावी यांचेमध्यें कटकट उत्पन्न झाली व ती कटकट संभाजी महाराजांकडे जाऊन त्यांनी दिवाकर गोसाव्यासारखा निकाल दिला. याला कल्याणस्वामींची अनुमती होती. या बाबतींतील कल्याणस्वामींचें एक पत्र परिशिष्टांत छापले आहे. रामदासांच्या शिष्यां- मध्यें संस्थानच्या व्यवस्थेसंबंध पुनरपि तंटे उत्पन्न होऊं नयेत ह्मणून शाहूच्या कारकीर्दीत रामदासांच्या शिष्यमंडळीच्या अनुमतीनें रामदासांच्या वडील बंधूंच्या घराण्यांतील पुरुषाकडे संस्थानची व्यवस्था वंशपरंपरेनें