पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ सज्जनगड व समर्थ रामदास. या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणारे धुळ्यांचे ÷रा. चांदोरकर यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राज- वाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्र- दायिक कालालाच चिकटून राहिले आहेत. रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं. 66 रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीं- तील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आप- ल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्तो पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व ÷ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जम- विलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहि- तीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.