पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १०५ रास दिसून येऊं लागल्यामुळे व हनुमानस्वामींच्या बखरींत एका ठिकाण संवत्सराचें नांव 'विकारी' असें दिल्यामुळे व बखरांतील तीथ वा ही या 'विकारी' संवत्सराशीं जुळत असल्यामुळे शक १५८१ हा भेटीचा खरा शक असला पाहिजे अशी कांहीं जणांनी कल्पना काढली. कारण शक १५८१ सन १६५९ याच वर्षी शिवाजीनें (या सालाचा संवत्सर ' विकारी ' नांवाचा आहे.) अफजूलखानास मारिलें व अफजूल- खानास मारल्यावर शिवाजी रामदासांस भेटावयास गेला व त्या वेळीं शिवाजीला उद्देशून आठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील उत्तम पुरुपलक्षणाचा समास रामदासांनी सांगितला अशी दंतकथा आहे. तेव्हां सन १६५९ हाच भेटीचा काळ असला पाहिजे असे प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. पण या म्हणण्याला खरोखरी जुना कोणताच पुरावा नाहीं. अफझुलखानाच्या वधानंतर लागलीच शिवाजीमहाराज रामदासांस भेटले ही दंतकथा मागें दिलेल्या रचनाकालावरून उघड खोटी ठरते. कारण याच साली रामदास दासबोधाचा साहावा दशक लिहीत होते गोष्ट निर्विवाद आहे. साहांपासून अठरा दशक त्यांनी पांचसात महिन्यांत लिहिले असतील असे संभवत नाहीं. तेव्हां हा उत्तम पुरुषलक्षण समास रामदासांनी शिवाजीच्या त्या प्रसंगाला अनुसरून मागून केव्हां तरी लिहिलेला असावा व तो पुढे मोठ्या दासबोधांत अन्तर्भूत केला गेला असावा. शिवाय 'विकारी' हें नांव हनुमानस्वामींच्या बखरींत अगदर्दी नजरचुकीनें पडलें आहे यांत शंका नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं प्रथम भेटीचा शक १५७१ धरून पुढील सर्व विवेचन केले आहे. म्हणजे रामदास परळीस १५७२ शकांत आले असे म्हटले आहे. खेरीज प्रथम भेटीचा काळ शके १६८१ घरला तरी भेटीच्या वेळीं बखरींत वर्णिलेल्या शिवाजीच्या परिस्थितीशीं या शकाचाही मेळ बसत नाहीं. तेव्हां सन १६५९ हा भेटीचा खरा काळ असे मानतां येत नाहीं. कारण त्याला • सांप्रदायिक किंवा ऐतिहासिक कोणताच पुरावा नाहीं. तेव्हां शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची प्रथम भेट खरोखरी केव्हां झाली हा प्रश्न शिल्लक राहतोच.