पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ सज्जनगड व समर्थ रामदास. असती. पण दासबोधावरून तसें दिसत नाहीं. आतां दासबोधाचा रचनाकाल आनुषंगिक रीतीनें दासबोधांत आला आहे. दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चवथ्या समासाचे प्रारंभी युगाची कालगणना सांगितली आहे त्यांत खालील ओवी आहे:- चार सहस्र सातशें साठी। इतुकी कलियुगाची राहाटी। उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ म्हणजे हा दशक लिहितांना कलीयुगाचीं चार हजार सातशें साठ वर्षे झालीं होतीं. ही कलियुगाची कालगणना वराहमिहिरापासून चालत आली असून आपल्या हल्लींच्या पंचागांत गतकली दिलेला असतो. त्या- वरून रामदास ज्यासाली दासबोधाचा सहावा दशक लिहीत होते तें साल शके १५८१ (सन १६५९) होतें असें ह्मणणें भाग आहे. बखरींतील हकीकर्तीत तर सन १६४९ मध्ये म्हणजे प्रथमभेटीचे वेळीं रामदासांनी शिवाजीला तेराव्या दशकांतील लघुबोध नांवाच्या समासांतील उपदेश केला असे म्हटलें आहे. म्हणजे बहुतेक दासबोध रामदासांनी १६४९ पूर्वीच पुरा केला असला पाहिजे असा बखरीतील हकीकतीवरून तर्क होतो. अर्थात बखरींतील भेटीचा कालनिर्देश चुकीचाच असला पाहिजे असे या दासबोधाच्या अन्तःप्रमाणावरून ठरतें. बखरीतील कालनिर्देश चुकीचा आहे हे म्हणणे आणखी एका ऐति- हासिक गोष्टीनें सिद्ध होतें. शिवाजी व रामदास यांची भेट जर सन १६४९ मध्ये खरोखरी झाली असती व त्यावेळी शिवाजीने जर अनुग्रह घेतला असता तर आपल्या गुरूच्या देवळास व मठास कांहीं तरी कायमचें उत्पन्न त्यानें हटकून करून दिले असते. पण शिवाजीनें चाफळच्या मठास किंवा परळीच्या मठास सन १६७४ पूर्वी नक्त किंवा गांवें इनाम दिल्याचा दाखला सांपडत नाहीं. सर्व सनदा १६७४ पासून १६८० पर्यंतच्या व पुढे संभाजी महाराजांच्या वेळच्या आहेत. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन व सातशें होन दिले ही बखरींतील हकीगत स्वतंत्र सनदांसारखा पुरावा नव्हे हे उघड आहे. भेटीचा सांप्रदायिक शक चुकीचा आहे असें अर्वाचीन इतिहासका- 1