Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. महाराज बोलले कीं प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती आज्ञेवांचून पाऊल हीं पुढें पडावयाचें नाहीं. शिवाजीचा याप्रमाणें निश्चय पाहून रामदासांनी म्हटलें, "माझें परम दैवत राम किंवा हनुमान हा तुझ्या अंगांत येऊन तुझ्या अडचणीच्या प्रसंगी तुला सल्लामसलत देईल ती माझीच आज्ञा समजून तूं तदनुरूप वर्तन कर." स्वतंत्रपणे आख्यायिका रचावयाची असती तर ती अशा तऱ्हेची नसती काय ? या आख्यायिकेंत शिवाजीची शिष्यभक्ति व रामदासांची महती दिसून आली नसती काय ? शिवाय बखरींप्रमाणे पहातां राम- दासांला आपल्या आराध्य दैवताचा फार अभिमान असे, इतका कीं तो पंढरपुर/ सारख्या तीर्थास राम नाहीं म्हणून कित्येक काळपर्यंत गेला नाहीं.. या एकाच गोष्टींत रामदासांस भवानी देवीचाच उमाळा कां आ याचा अर्थ इतकाच कीं शिवाजीच्या जुन्या आख्यायिकेस टाकून देणें शक्य नव्हतं म्हणून त्या आख्यायिकेला धरून ही रामदासांच्या महत्त्वा- बद्दलची आख्यायिका रचावी लागली. असो. १ तर वरील विवेचनावरून हनुमानस्वामींची बखर ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य नाहीं; ती व्रतमाहात्म्य किंवा देवतामाहात्म्य याप्रमाणें दंतकथांनी व भाकड कथानीं भरलेली आहे. तेव्हां अवांतर ऐतिहासिक पुराव्यावांचून त्यांतील हकीकतीवर विश्वास ठेवणें रास्त नाहीं हें उघड आहे. तरी शिवाजीचा व रामदासांचा संबंध खरोखरी कशा प्रकारचा होता व तो केव्हांपासून घडून आला या वादग्रस्त प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या आतां ऊहापोह करूं.