पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १० शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध कशा प्रकारचा होता-म्हणजे रामदास हे शिवाजीचे स्फूर्ति- दाते राजकारण गुरु होते किंवा निव्वळ गुरुमंत्र देणारे मोक्षगुरु होते, हा पहिला वादग्रस्त प्रश्न आहे व तो संबंध केव्हां घडला हा दुसरा वादग्रस्त प्रश्न ९७ आहे. पण पहिल्या प्रश्नाचा आस्तिकपक्षी निकाल केला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा निर्विकार मनानें विचार करणे कठीण जाते. कारण मग शिवाजी व रामदास यांची भेट पूर्ववयांतच झाली असली पाहिजे असे मानण्याकडे मनाचा ओढा होतो; इतकेच नव्हे तर दुसऱ्या प्रश्नाच्या पुराव्याची ओढा- ताण करून व क्लिष्ट कल्पना काढून तो पहिल्या प्रश्नाच्या निकालार्शी जुळता करून घेण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणून या दोन्ही प्रश्नांच्या समाधान- कारक निकालाकरितां दुसऱ्या प्रश्नाची चर्चा आधी करणें इष्ट आहे. ती निर्विकार मनानें झाल्यावर मग पहिला प्रश्न सोडविण्याचें काम कठीण नाहीं. करितां रामदास व शिवाजी यांच्या प्रथमभेटीच्या कालाच्या प्रश्ना- कडे वळू. रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदा- सांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे ( सन १६४९ ) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महा- राजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टानें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोपद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें हाजणे बरोबर नाहीं. पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशो- धक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐति- स...७