पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ घरांतली कामें. __पाखडण्याला जिन्नस पुढून उडवून मागे घ्यावयाचा, आणि असडण्याला मागून पुढे ढकलावयाचा असतो. वेचण्याला सुपाला खालून बोटांची टिचकी मारून व पदार्थ रोळून रोळून काढावा लागतो. हे तिसरे काम अंमळ कठीण आहे. तरी तें संवयीने येऊ लागते. मुप-हें बांबूच्या सालीचे किंवा गवताचे करतात. सुपें निरनिराळ्या आकृतींची असतात. दक्षिणी सुपांत शेंड्याचा मध्य आणि कोपरे गोल ठेवून शेवटाला दोन्ही काठ अगदी साफ उताणे होऊन जावे लागतात. इतर प्रांतांतल्या सुपांचे काठ तिन्ही बाजूंनी भिंतीसारखे अगदी ताठ, उंच, व सरळ असतात. मात्र दोन्ही हातांच्या कडा पुढे शेवटाकडे उतरत्या होत जातात. या सुपाने वेंचण्याचे काम साधत नाहीं; ह्मणून दक्षिणी सूपच चांगलें. टोपले-सूप, टोपलें आणि चाळणी ही एकाच कुटुंबांतली आहेत. त्यांतल्या त्यांत कदाचित् टोपल्यास मातृस्थानाचा मान योग्य होईल. ह्मणून त्याविषयी काही माहिती असणे अवश्य आहे. टोपले आणि पाटी हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पाटी आकाराने कांहींशी लहान आणि टोपले मोठे असते. लहान पाटीला परडी, आणि मोठ्या व पसरट पाटीला हारा (ऐरणी) ह्मणतात. तिचा आकार कढईसारखा किंवा उभा असला तर तिला ग्वाल्हेर, झांशीकडे डाल्या आणि दक्षिणेत दुरडी ह्मणतात. टोपल्या बांबूच्या, वेताच्या, कित्येक काड्यांच्या, पानांच्या किंवा कागदाच्या लगद्याच्या करतात. कसल्याही केलेल्या असल्या, तरी त्यांचे बूड व काठ ही मजबूत पाहिजेत. सूप टोपले चांगले टिकावें झणन त्यांस पिवळ्या मातीने सारवितात, किंवा चिंध्यांची राख, किंवा मेण, राळ आणि गेरू तेलांत कालवून ते लावतात. त्यास मेणवलीं ह्मणतात.