पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. mmmmmmmmmmmmmmmmmmm या चाळणीने हवे तितकें जाडबारीक रवासपीट पिठांतून काढून घेतां येते. - चाळणीचा उपयोग पिठाशिवाय आणखी साखर, दूध, तूप, चहा, आंब्याचा रस, श्रीखंड, इ० गाळण्याकडेही होतो. मात्र यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या चाळण्या लागतात. दूध व श्रीखंडासाठी वस्त्राची चाळणी लागते. श्रीखंडासाठी जाड खादीचा रुमाल घेतात. या रुमालाची वीण घट्ट नसली पाहिजे. दूध, चहा, कॉफी, कोको, भांग, थंडाई वगैरे पातळ पदार्थ गाळण्याला पातळ वस्त्र लागते. वस्त्राने गाळण्याचे काम हात घालून किंवा पळीने अथवा डावाने करावे लागते. हे काम चाळणीभर करावें. मध्येच एके जागीं करूं नये. चाळणी अगोदर चांगली झाडून पुसून घ्यावी, आणि काम झाल्यावरही तशीच झाडून पुसून ठेवावी. तिच्यांत एखादा ओशट जिन्नस गाळावयाचा असेल, तर ती धुऊन घ्यावी आणि काम झाल्यावर ऊन पाण्याने कुंचा फिरवून धुऊन टाकावी. वाळू देऊ नये. तिच्या खालच्या उभ्याआडव्या तारांतून कांहीं अडकून राहिले असेल ते नीट काढून टाकावे, आणि ती फडक्याने कोरडी करून केर उडणार नाही, अशा उंच जागी अगर खुंटीवर टांगून ठेवावी. पाखडणे. _ यांत १ पाखडणे (केरकचरा वगैरे मिसळलेले पदार्थ काढून टाकणे ), २ असडणे (वजनदार खडे वर करून घेणे), ३ आणि वेंचणे ( निरनिराळ्या आकाराचे व गुणांचे पदार्थ वेगळे काढणें ) अशी तीन कामे येतात.