पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. निसणे-निवडणे. - जी जिन्नस चाळून पाखडून स्वच्छ करण्यासारखा नसते ती निवडून निसून साफ करतात. दोन्ही कामें एकाच प्रकारची आहेत, पण निवड हा शब्द चांगल्याच्या निवडीला आणि निसण वाइटाच्या निवडीला लावतात. चांगल्यांतून वाईट काढून टाकणें तें निसणे, आणि वाईटांतून चांगले काढून घेणे ते निवडणे. निसण्यांत एक प्रकार 'वरंगळण्या'चा आहे. एखादा पाट भुईवर उंच कलता उभा करून मुगासारखे सरपटत जाणारे दाणे त्यावरून थोडथोडे सोडावे आणि ते खाली पडत असतां मध्येच त्यांतील निसण बाजूला सारीत जावें. निसण्या-निवडण्याच्या कामांत विशेष चातुर्य लागत नाही. बारीक दृष्टि मात्र लागते. ह्मणून हे काम रात्रीचें करूं नये, आणि हे काम सुपाने व चाळणीने आधी जितके करून घेता येईल तितकें आधी करून घ्यावे. इतर प्रकार. निरनिराळ्या जिंनसांचे तुकडे किंवा बारीक पीठ करण्याचे, दळणकांडणाशिवाय आणखीही कित्येक प्रकार आहेत, आणि त्यांची साधनेही निरनिराळी आहेत. विस्तारभयास्तव त्यांच्या विषयी माहिती. न देतां येथे काहींची नुसती नांवें सांगतों-- काम साधने चिरणे, कापणे, तुकडे करणे.... .... विळी, चाकू, सुरी इ० किसणे .... .... .... किसणी खवणे .... .... .... खवणी खवणी कातरणें अडकित्ता, कातरी.