पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें.. wwwwwwwwwwwwwwwwwwwmmmmmmmmwww वेळ-कांडण्याच्या वगैरे कामाला रात्रीची वेळ चांगली. विशेषसे काम नसेल तर तिसरे प्रहरी हे काम करावें.' । कांडतांना कामाकडे विशेष लक्ष ठेवावे लागते आणि डोळे व हातपाय सगळेच आपापले व्यापार करीत असतात. यामुळे दळतांना जसे गाणी मणण्याचे साधते, तसें कांडतांना साधत नाही. ओंव्या किंवा ज्यांत शब्दांचे वर खाली आघात होत असतील, अशा प्रकारची गाणी त्यावेळी ह्मणतां येतील. अलीकडे कुटण्याची यंत्रेही निघाली आहेत. त्यांनी पोह्यांसाठी भात [ साळी ] कुटण्याचे काम में पूर्वी फार श्रमाचे वाटत असे, तें फार हलके झाले आहे. खलबत्ता, जात्याचा जसा पाटावरवंटा, तसा उखळमुसळाचा खलबत्ता हैं संक्षिप्त स्वरूप आहे. खलबत्ते बहुधा सर्व बीडाचे ( एक प्रकारचे लोखंड ) देशांत घडून किंवा ढाळून केलेले असतात. ते लहान मोठे असतात. ते बुडाला जाड असावे लागतात. बत्ते खलाच्या उंचीच्या सिद्ध करुनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्धबुद्धि गे ॥ आठवण घरी मज जागें करीं । मागील पाहारी शेवटिंचा गे ॥ समतुकें घाव घालीं वो साजणी । मी तुज मिळणीं जीवें मिळे ॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निशेष ते सडी ओज करी ॥ सरलें कांडण पाकसिद्धि करीं । मेळवण क्षीरी साकरेचें ।। उद्धव अक्रुर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥ तुका ह्मणे मज माहेरी आवडी । ह्मणोनी तांतडी मूळ केलें ॥ २ सावडी कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सारा ॥ मुसळ आधारी आवरूनी धरी । सांवरोनी थोरी घाव घाली ॥ वाजती कांकणे अनहात गजरे । छंद माहियेरे गाऊं गीती॥ कांडितां कांडण नव्हे भागशीण । तुज मजपण निवडे तो ॥ तुका ह्मणे रूप उमटे आरिसा। पाक त्यासरिसा सिद्ध झाला ॥