पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. wwwwwwwwwwwwwwwww wwwwwww वर उडणार नाही अशी व्यवस्था करावी. जिन्नस निसून, निवडून, पाखडून किंवा जरूर लागल्यास शेकून अगर तापवून घ्यावा. - कांडण्याची जिन्नस फार कठीण किंवा आकाराने मोठी असेल, तर ती अगोदर फोडून घ्यावी. एखाद्या जिनसेचे पीठ लवकर होत नसेल, तर ती अगोदर सुकवून अगर तापवून घ्यावी. कांडतांना मधून मधून चाळून त्यांतला भरडा काढीत जावे आणि तो पुनः पुनः कुटून गाळावा; झणजे हे काम लवकर होते. एखादा जिन्नस खकाणा उडण्यासारखा असेल, तर तेल किंवा दुसरा शामक पदार्थ त्यांत मिसळावा. तिखट कुटतांना मुलांना दूर ठेवावें. तिखट कुटण्याचें तें बैठकीच्या किंवा आजारी माणसाच्या जागेजवळ कुटूं नये. चिकट जिन्नस उखळांत कुटूं नये. कांडतांना एखादी जिन्नस उखळांत किंवा मुसळांत चिकटून बसते. ती पळीच्या दांड्याने किंवा काडीने वगैरे उकरून काढीत जावी. कांडण्याचे वेळी लक्ष त्याकडेसच ठेवावें; नाही तर मुसळाचे घाव जोराने व योग्य जागी पडत नाहीत. मुसळ उखळाचे कांठावर, किंवा बाहेर आपटते आणि केव्हां केव्हां हातापायांवर पडण्याची भीति असते. कांडणे झाल्यावर उखळ, मुसळ व कांडण्याची जागा ही साफ करावी. खकाणा राहिल्यास सारवावी. उखळांत कोंडा किंवा कचरा भरून ठेवू नये. जिन्नस गाळावयाची किंवा पाखडावयाची असल्यास, तें काम लागलेंच करून टाकावें. हे काम शिकण्यास प्रथम मुसळ उचलेल इतक्या बेताच्या वजनाचे घेऊन क्रमा क्रमाने कांडणे, कुटणे, आणि सडणे यांची संवय अगोदर उभ्याने, नंतर बसून, प्रथम एकीने, मग दोघींनी, प्रथम एका मुसळाने मग निरनिराळ्या मुसळांनी, प्रथम भुईसपाट उखळावर मग उभ्या उखळीवर, अशा क्रमाने शिकत जावें.