पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. सवापट लांब, शेंड्याला चापट व खाली खोल आणि मुठींत धरण्यासारखे असावे. सडणे खेरीजकरून खलबत्त्यांत होणारी बाकीची सर्व कामें उखळमुसळांनी होणारी असतात. दळण्याभरडण्याचे काम दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरही करता येते. पण कांडण्याकुटण्याचे काम नेहमीं तळमजल्यावरच करावे लागते. चाळणे, गाळणे व पाखडणे. कित्येक जिंनसा अशा असतात, की त्या जशाच्या तशाच दळण्याकांडण्याला घेता येत नाहीत. त्या प्रथम साफ करून निवडून घ्याव्या लागतात, आणि दळल्याकांडल्यावरही त्यांस पुनः साफ करावें, निवडावें, किंवा त्यांत एकाहून अधिक प्रकार झाले असल्यास ते निरनिराळे करावे लागतात. उदा०—गहूं. यांत मातीचे खडे, बारीक बारीक दगड, व दुसरी कित्येक धान्ये वगैरे मिसळलेली असतात. कचित् काड्याही सांपडतात. अर्थात् गव्हांची कणीक करावयाची झाली, तर ते प्रथम साफ करणे अवश्य आहे. तसेच ते दळून कणीक झाली ह्मणजे तींतून गव्हांची चापड आणि जात्यांतून निसटून पडलेले गहूं वगैरे काढावे लागतात. कणिकेंतून रवा, सपीट, सांजा, चापड हीही निरनिराळी व काढावयाची असतात . यासाठी चाळणे, गाळणे, पाखडणे वगैरे गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टी करण्याची साधने झणजे सूप, चाळणी, आणि टोपली ही आहेत. चाळणे आणि गाळणे हे एकच काम आहे. गाळणे फडक्याने करतात, व चाळणे चाळणीने करावयाचे असते, येवढाच काय तो १ मुंबईस चाळी चांगल्या मजबूत बांधलेल्या असतात. तेथें ही कामें सुद्धा वरच्या मजल्यांत करतां येतात.