पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ घरांतली कामें. पीठ होतें. उदा०-तीळ कांडणे. ही तिन्ही कामें उखळमुसळांनी करावयाची असतात. कांडण्यांत हवा तसा हात टाकतां येतो, पण कुटण्याला युक्ति आणि सडण्याला थोडे चातुर्य लागते. कुटणे वगैरे कामें करण्यास संवय पाहिजे. । उखळ व मुसळ-उखळ दगडी असते. लाकडाच्या मोठ्या उखळाला उखळी ह्मणतात. उखळाचे तोंड खाली भुईबरोबर पक्के बसविलेले असते. पण लाकडी उखळी कधी पक्की बसवीत नाहीत. बहुधा सडण्याचे व कुटण्याचे काम लाकडी उखळीत आणि कांडण्याचे दगडी उखळांत करतात. उखळावर सुद्धां ही तिन्ही कामें होतात. मसळ नेहमी लाकडाचे असून त्याचे दोन प्रकार आहेत. १ हे खाली जाड असून वर निमुळते होत गेलेले असते, व मध्यभागी हातांत धरण्याकरितां खोलगट भाग असतो. तळाला लोखंडाचे कडे मुसळ फट नये ह्मणून घट्ट बसविलेले असते. या मुसळाला दक्षिणी मुसळ ह्मणतात. यांत कित्येक सोयी आहेत. २ हे सरळ वाशासारखें किंवा सळईसारखे असते. यालाही कित्येक तळाशी लोखंडी कडे बसवितात. लाकडी उखळी भुईवर उंच ठेवितात. त्यामुळे तिच्यावर काम करतांना उभे रहावे लागते. यांतले जिन्नस उडू लागल्यास क्षणोक्षणी सारतां येत नाहीत, ह्मणून उखळ्या बहुधा खोलगट असतात. उखळावर बसन किंवा उभ्याने दोन्ही प्रकारे काम करता येते. मात्र उभ्याने काम करतांना उडालेला जिन्नस पायाने उखळांत लोटावा लागतो. उखळावर दोघींनाही आळीपाळीनें—एकीने बसून व दुसरीने उभे राहून किंवा दोघींनीही बसून हात मारतां येतात. उखळावर काम करण्यापूर्वी उखळ, मुसळ, भोवतालची जागा, व आपले हातपाय स्वच्छ करावे, जुने वस्त्र नेसावें, जिन्नस डोक्या