पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. ८५ मात्र दगडच लागतो. झणून उगाळण्याचे जिन्नस सहाणेवर उगाळतात. सहाण पक्क्या दगडाची व थोडीशी खरबरीत असावी लागते. उगाळण्याचे व घासण्याचे काम करतांना हात स्वच्छ धुतलेले असावे. त्याचप्रमाणे उगाळण्याची जिन्नस आणि सहाण ही स्वच्छ असावी. उगाळतांना खाली सांडूं नये किंवा खाली ओघळ येऊ देऊ नयेत. हात बरबटूं नयेत. सूचना-घासणे सुके आणि उगाळणे ओले असते. तरी व्यवहारांत घासणे हा शब्द उगाळण्याच्या अर्थानेही लावतात. जसेंचंदन घासणे. मिक कांडणे. कांडण्यांत १ सडणे, २ कुटणे, आणि ३ कांडणे अशा तीन गोष्टी येतात. सडणे हा प्रकार अलीकडचा दिसतो. जुन्या ग्रंथांतून कुटणे आणि कांडणे अशा दोनच गोष्टी लिहिलेल्या आहेत. पैकी कांडणे हा शब्द तांदुळाला व कुटणे हा इतर धान्यांना वात्स्यायनसूत्रावरील टीकाकाराने लाविलेला आहे. वस्तुत: सडणे हा तरी कुटण्याचाच एक प्रकार आहे. हलक्या हाताने कुटण्याला सडणे ह्मणतात. जिन्नस तुटूं न देतां हलक्या हाताने त्याच्यावरची बारीक त्वचा (कोंडा ) काढणे याला सडणे ह्मणतात. कुटणे ह्मणजे मारून मारून नरम करणे. जसे-साळीचे पोहे किंवा पापडाचे पीठ कुटणे. कांडणे निराळे आहे. कांडण्यांत जिंनसेचे तुकडे होऊन १ कुरुंदाच्या दगडाची सहाण चांगली समजतात. श्रीमान् लोक सहाणेला तांब्यापितळेच्या किंवा चांदीच्या अडणीत बसवितात. जेथें पाव अर्धाशेर चंदन रोज लागते, अशा काही मोठाल्या मंदिरांतून जात्यायेवढाल्या मोठ्या सहाणी असतात, व त्यांचे भोंवतीं एक पाळे करतात. त्यामुळे पाणी किंवा गंध भुईवर सांडून जागा खराब होत नाही.