पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ घरांतली कामें. nannnnnnnnnnnnnnnnnannnnnnnn जिन्नस ऊन करण्याची अवश्यकता नाही. कामाच्या आरंभी व शेवटी खल चांगला धुऊन पुसून स्वच्छ करावा. खलतांना खलांत बत्ता सारखा फिरावा, पण तो आपटूं नये, नाही तर एखादे वेळी खल फुटावयाचा ! . औषधांचे काम फार नाजूक असतें. सबब त्यांचा खल वेगळा असावा. तो खल दुसऱ्या कामांना घेऊ नये. खलण्याघोटण्याचा जिन्नस फार असला तर ते काम करण्यासाठी अलीकडे वाफेने किंवा इतर शक्तीने करण्याची यंत्रे निघाली आहेत. खऱ्या मजबूत दगडाच्या खलास फार किंमत पडते. पण ते कित्येक वर्षे टिकतातही. कित्येक वैद्यांच्या घरीं शेपन्नास वर्षे सारखें खलण्याचे काम चालूनही त्यांचे खल गहूंभर सुद्धां झिजत नाहीत. अलीकडे कोणत्याही दगडाचे खल करून, त्याला काळे पक्कें रोगण लावून, ते अस्सल दगडाचे खल म्हणून विकतात. म्हणून खल विकत घेतांना फार दक्षता ठेवावी लागते. घासणे व उगाळणे. वाटणे हे जसे दळण्याभरडण्याचे लहान रूप, तसे घासणेउगाळणे हे खलण्या-- वाटण्याचे लहान रूप आहे. जिन्नस फारच थोडी ह्मणजे मासे रति वगैरेत परिमाणांत असली म्हणजे ती खलतां येत नाही. अशी जिन्नस उगाळून किंवा घासून घ्यावी लागते. जसे मुलांची घुटी, मात्रा, व दुसरी कित्येक औषधे इ०. कांहीं जिन्नस घासण्याने किंवा उगाळण्याने त्यांच्यांत विशेष गुणधर्म येतात. किंवा ते विशेष उपयोगी पडतात. उदा०-कायफळ, दालचिनी, जायफळ, इ०. काष्ठमय जिन्नस बारीक करून पातळ ठेवावयाचे असले, तर उगाळूनच ठेवणे सोयीचे असते. जसें-चंदन घासण्याचे काम दगड, वीट किंवा खापर यांच्यावरही करता येते. उगाळण्याला