पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. त्याही स्थितीतल्या व दर्जाच्या स्त्रियांना उपयुक्त होतील असा भरंवसा आहे. उपक्रमादाखल इतके सांगून आतां वर सांगितलेल्या घरकामांचे क्रमाक्रमाने विवेचन करूं. प्रकरण २रें केरवारा. १ आपल्यांत ह्मण आहे की 'जेथें केरसुणी फिरे , तेथें लक्ष्मी फिरे. ' स्वच्छतेचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी ही ह्मण प्रचारांत आली असली पाहिजे हे उघड आहे. घरांत स्वच्छता राखणे अत्यंत अगत्याचे आहे ही गोष्ट जुन्या व नव्या दोन्हीं मतांच्या लोकांस कबूल आहे. पण घर झाडावे कसें तें मात्र सर्वांनाच ठाऊक असते असे नाही. यासाठी पुढील सूचना लक्षात ठेवाव्या. २ घरांत कोठेही केर पडलेला राहू देऊ नये. तो अमंगल क रोगकारक आहे. घराच्या ज्या भागांत माणसांचा वावर असेल, त्या सर्व भागांतला केर दिवसांतून एकवेळ तरी निघाला पाहिजे. ज्या भागांत पुष्कळ वरदळ असेल तेथे जेव्हा जेव्हां केर झालेला दिसून येईल, तेव्हां तेव्हां तो लागलाच काढून टाकिला पाहिजे. भाज्यांचे डेंख, फळांच्या साली व बिया, चोयट्या, व पुरुषांच्या बैठकीतले विड्यांचे व सिगारेटचे तुकडे वगैरे थोडा वेळ सुद्धा तसेंच पडून राहूं देणे चांगले नाही. ३ संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी केर काढू नये. काढलाच तर निदान तो लागलीच बाहेर टाकू नये. शिप्तरांत भरून तसाच एका कोपऱ्यांत राहूं द्यावा, आणि सकाळी उजेडांत तो नीट पाहून मग टाकावा. कारण, संध्याकाळची वेळ मंडळीची घरी येण्याजाण्याची