पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १ लें. नसतात. तथापि त्या सर्वांचे विवेचन एका पुस्तकांत होणे शक्य नसल्यामुळे ठळक ठळक घरकामांचाच विचार या पुस्तकांत केला आहे. अशी ठळक कामें ह्मणजे १ केरवारा, २ रांगोळी घालणे, ३ सडासंमार्जन,४ चूल पोतरें, ५ उष्टें खरकटें, ६ भांडी घासणे,७ धुणे,८ पाणी, ९ संध्ये पूजेची उपकरणी मांडणे व आवरणे, १० दळणकांडण, ११ बिछाने घालणे काढणे १२, तेलवात, १३ विड्याचे सामानाची व्यवस्था, १४ पानपत्रावळ, १५ बागेची निगा, १६ दूधदुभतें, आणि १७ मुलांची जोगवण ही होत. यांतली काहीना काही तरी आपल्या स्थितीच्या मानानें गरीब व मध्यम वर्गातल्या स्त्रियांना घरी करावी लागतात, आणि श्रीमंतांच्या बायकांनी नोकरांकडून ती करवून घेऊ झटले तरी नोकरांकडून ती योग्यप्रकारे करवून घेण्यास 'घरधनिणीला त्या कामांची पद्धति माहित असण्याची अत्यंत जरूरी असतेच. ह्मणून या पुस्तकांत वरील १७ गोष्टींचेंच विशेषतः पद्धतशीर विवेचन करून कोणते काम कसे करावे व तें करतांना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे सांगितले आहे. हे विवेचन सर्व स्थितींतल्या व सर्व मतांच्या स्त्रियांना बहुधा लागू पडेल अशीच काळजी घेण्यात आली आहे. तथापि जुन्या मतांच्या व जुन्या वळणाने चालणाऱ्या कुटुंबांचीच संख्या समाजांत जास्त असल्यामुळे त्यांच्या स्थितीकडे विशेष लक्ष देऊन पुस्तकाची रचना केली आहे. कित्येक प्रकरणे नव्या मताच्या व साहेबी पद्धतीने राहणाऱ्या स्त्रियांना कदाचित उपयुक्त वाटणार नाहीत. कित्येक स्त्रियांना घरच्या गरिबीमुळे किंवा जागेच्या अडचणींमुळे बागबगीचा तयार करण्याचे सामर्थ्य नसेल; कित्येकांना शहरांतल्या राहण्यामुळे पानपत्रावळ हे प्रकरण अनवश्यक वाटेल. अशी कित्येक प्रकरणे वगळली तरी बाकीची प्रकरणे कोण