पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २ रें. असते; त्यावेळी केर काढणे बरे नाही. रात्रीच्या वेळी एखादी बारीक सारीक वस्तु केरांत गेली तर दिसावयाची नाहीं. ४ सकाळचा केर होईल तितका लवकर ह्मणजे घरांतली माणसें हिंडूं फिरूं लागण्यापूर्वी काढावा. निजण्याच्या खोलीतला केर निजलेली माणसें उठून गेल्यावर काढावा, आणि संध्याकाळचा केर घरांतली मंडळी बाहेर गेल्यावर आणि ती परत येण्याच्या अगोदरझणजे या दोन्ही गोष्टींच्या मधल्या वेळांत--काढावा. मंडळी बसली असतां केर काढण्यासाठी जाणे चांगले नाही. कित्येक देशांत तर तो एक मोठा अपमान समजतात. ५ बसून केर काढू नये. ओणव्याने किंवा त्यापेक्षाही चांगले ह्मणजे केरसुणीला लांब काठी बांधून उभ्याने काढावा. थकवा आला तर मात्र बसावें. घर लहान असल्यास ओणव्याने काढला तरी चालेल. ६ केर काढते वेळी मळकें व धुवावयाचे असेल असें वस्त्र नेसावे किंवा असे एखादें फडके नेसलेल्या वस्त्रावरून गुंडाळावें. डोकीवरून पदर घ्यावा अगर फडके बांधावे. झाडतांना केर आपल्या अंगावर-विशेषतः डोळ्यांत-पडू देऊ नये. तशीच तो दुसऱ्याच्याही अंगावर न उडेल अशी खबरदारी घ्यावी. केर 'फार असेल, आणि माणसाचा वावरही सारखा चालू असेल, तर झाडण्याच्या जागी अगोदर पाणी शिंपून मग केर काढावा. ह्मणजे पाण्याने तो दबतो, उडत नाही. वारा समारचा असेल तर केर काढतांना दार लावून घ्यावे. झाडतांना अगोदर पाणी शिंपडून मग केर काढल्याने तो उडून भिंतीवर किंवा खोलीतल्या सामानावर बसत नाही. केर उडू देणे स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दोन्ही दृष्टींनी बाईटच आहे. केर माणसाच्या नाकातोंडांत गेला असतां त्याच्या