पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. डाग राहणारा किंवा कडू पदार्थ त्यावर वाढू नये. अशा कामासाठी वेगळा पाटा असलेला चांगला. खलणे किंवा घोटणे. खलण्यांत वाटणे किंवा घोटणे या दोन्ही क्रिया येतात. घोटण्यांत नुसता घोटा फिरवावयाचा असतो. कधी कधी घोटण्याचे काम प्रहर, दोन प्रहर, आठ प्रहर, किंवा याहूनही जास्त वेळ करावें लागते. घोटण्याने औषधाचे परमाणु अत्यंत सूक्ष्म होऊन त्यांचा गुण शरीरावर फार त्वरेने होतो. - पदार्थ फार थोडा असला ह्मणजे तो बारीक करण्यासाठी खलावा लागतो. औषधि, वेलदोडे, केशर हे जिन्नस खलतात. खल-खल लहान मोठे पाहिजे तसे मिळतात. देशी खल दगडी व डोंग्याच्या आकाराचे असतात. इंग्रजी खल चिनी मातीचे किंवा काचेचे असून, आकारानें गोल पेल्यासारखे असतात. पण इंग्रजी खल घोटा चालविण्याचे उपयोगी नाहीत. खलाला दगड फारच कठीण पाहिजे. नाही तर खलतांना व घोटतांना दगडाचे बारीक परमाणु खलण्याच्या जिनसेंत उतरण्याची भीति असते. खलण्याघोटण्याचे कामांत फक्त चिकाटी पाहिजे. कांही जिन्नस खलतांना काही विशेष तयारी करावी लागते. उदाहरणार्थ, केशर खलतांना त्यांतला ओलसरपणा घालविण्यासाठी अगोदर ते एका वाटीत घालून ती वाटी थोडा वेळ विस्तवाजवळ ठेवावी व वाटी ऊन झाली ह्मणजे तीतले केशर खलण्यास घ्यावे. असे न केले तर केशरांतल्या काड्यांची बारीक पूड लवकर होत नाही. जर फारबारीक पूड करण्याची जरूर नसेल, आणि ओलसरपणा नसेल. तर