पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ घरांतली कामें. munum किंवा घोटून अगर उगाळून बारीक करावे लागतात. असे करण्याची साधनें ह्मणजे १ पाटावरवटा, २ खल, आणि ३ सहाण ही तीन आहेत. पाटा-निरनिराळ्या कामांसाठी लहान मोठे पाटे लागतात; पाट्यांच्या आकृति दक्षिणेकडे व उत्तरहिंदुस्थानांत निरनिराळ्या असतात. दक्षिणेकडचे पाटे शेंड्याकडे अर्धचंद्राकृति असतात. उत्तरेकडचे बहुधा निमुळत्या टोकाचे असतात. दक्षिणी वरवंटा लांब, गोल, व पंजांत राहील येवढा मोठा असतो. उत्तरेकडचे वरवंटे उंच, चपटे, व आंखुड असतात. आकृति कशीही असो, पण पाटावरवंटा पक्कया दगडाचा, जाड, दळदार व टाकी दिलेला असावा.. पाट्याची कामें--रोजच्या चटण्या, मसाले, आणि नैमित्तिक परण, कुरड्याचे गहूं, वड्यांच्या डाळी, अनरशांची, पापडांची व तसरी कित्येक पीठे, इ० पाटावरवंट्याने वाटावयाची असतात. वाटण्याची रीत–एकदम सपाट्याने व जोराने वाटण्यास लागू नये. सावकाश थोडे थोडे घेऊन वाटावे. वरवंटा एकसारखा चालवावा. पाट्याच्या अगदी कांठापर्यंत वाटीत नेऊं नये. वाटावयाचा जिन्नस पुष्कळ असला, तर पाट्याच्या खाली एखादा कागद, पान किंवा पत्रावळ घालावी; ह्मणजे जिन्नस भुईवर सांडणार नाही. वाटतांना काही भाग जाड राहिला असेल, तर तो पुनः वरवंट्याखाली ओढन घेऊन वाटावा. आजूबाजूचा जिन्नस वाटावयाचा तसाच गाहतो. ह्मणून तो एखाद्या उलथ्याने, पळीच्या दांड्याने, किंवा बोटांनी सारून पुढे करून घेत जावा. सर्व जिनसेची सारखी बारीक प्रड होईल, असे वाटावें. वाटणे झाल्यावर पाटावरवंटा स्वच्छ धुऊन पुसन ठेवावा. चटण्यामसाल्यासाठी स्वतंत्र पाटा असावा. चिकट,