पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. ८१ wwwwwwwwwwwwwwwwww . दळण्याचे अगोदर जातें झाडून झटकून, सभोवतालची जागा केरसुणीने साफ करावी. भिंतीवर किंवा आढ्याला जाळी असतील तर ती झाडून टाकावी. दाण्यांची टोपली, वैरणाचे मापटें, बसण्याचा पाट, रात्र असल्यास दिवा, कुंचा, चाळणी वगैरे अवश्यक जिन्नस जवळ घ्यावे. ज्या हाताने दळावयाचे, त्याच्या उलट्या हाताला दळण्याची टोपली ठेवावी. मापट्याने वैरण घालावी. दळण्याचे कामी आळीपाळीने दोन्ही हातांचा उपयोग करावा. एकदम जोर करून दळण्यास लागू नये. त्याने लवकर थकवा येतो. सारखा वेग अखेरपर्यंत ठेवावा. मधून मधून अंगाचा घाम पुसावा. त्याचे थेंब पिठांत पडणे चांगले नाही. दळणे संपले ह्मणजे कुंच्याने पीठ गोळा करून पाटींत भरावें. वेळ असला तर चाळूनच भरावें. - मोलकरणीकडून दळण्याचे काम करवून घेणे असेल तर तें शक्य असल्यास आपलेच घरी करवून घ्यावे. नाहीतर दाण्यांत बदल किंवा भेसळ होण्याचा व दाणे चोरीला जाऊन पीठ कमी मिळण्याचा संभव असतो. दळण्याची यंत्रे-वाफेनें, किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जोराने यंत्रे फिरवून त्या यंत्रांनी दळलेले पीठ बारीक येते, आणि दळण्यांत उप्तन्न होणाऱ्या उष्णतेने पिठाचा सत्त्वांशही थोडासा जळून पिठाची चव बदलते, व तें पीठ पचण्यासही थोडे जड जाते. हाताने दळलेल्या कणिकेची रुचि कांही निराळी असते. वाटणे. - जात्याने दळण्यास किंवा भरडण्यास, जिन्नस कोरडा व पुष्कळसा लागतो. ओल्या जिनसेला जातें निरुपयोगी आहे. थोडा जिनस जात्याने दळण्यांत नुकसान आहे. ह्मणून असे जिन्नस वाटून, खलून,