पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० घरांतली कामें. raamarrrrrrrrrmanan ईश्वरस्मरणाची असली तर स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतां येतात. गाणी हलक्या सुरांत ह्मणावी. नाहीतर दुसऱ्यांना त्रास होईल. कोणताही जिन्नस दळण्यापूर्वी तो नीट चाळून, पाखडून व निवडून साफ करून घ्यावा. हळद, मीठ, शिंगाडे वगैरे जिनसांचे मोठाले तुकडे किंवा खडे असतील तर ते कुटून लहान करावे. दळण्याचे वेळी जुनें मळके वस्त्र नेसावें. डोक्यावरून कपाळापर्यंत आणि मानेपासून वर नाकपुड्यांपर्यंत पदर घालावा. ह्मणजे नाकातोंडांत पीठ उडणार नाही. आठवी माझी ओंवी । अठ्ठावीस युगें उभा चंद्रभागे। पांडुरंग ॥ ८॥ नववी माझी ओंवी । सरलें दळण चुकले मरण । संसारीचें ॥ ९॥ • दहावी माझी ओंवी । दहा अवतार न या संसारा । तुका ह्मणे ॥१०॥ दळीतां कांडीतां । तुज गाईन अनंता ॥ न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥ नित्य हाची कारभार । मुखीं हरी निरंतर ॥ माय बाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥ लक्ष लागले चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥१॥ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं। माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी ॥ नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग । जनी ह्मणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥ अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला ॥ नाचतां देवाचा गळाला पीतांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥ साधु संतांनी देवाला धरिलें मनगटीं । काय झाले ह्मणूनी दचकले जगजेठी ॥ ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजी वरिष्ठ । जडमूक भाविकां सोपी केली पायवाट ॥ नामयाची जनी लोळे संतांच्यां पायीं । कीर्तनप्रेमरस अखंड देई गे विठाई ॥