पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. ७९ आणि त्याला आंतून टांकी दिलेली असावी. जातें जमिनीत रोविलेले असेल तर ते जमिनीपासून अर्धा फूट उंचीवर असावें. वेळ-दळणाचे काम बहुधा पहांटेस चार वाजेपासून करतात, त्यावेळी घरांतली मंडळी बहुधा निजलेली असते. लहान मुलेही त्रास देण्यास नसतात,आणि बायकांनाही ही फुरसत असते.ही वेळ साधली नाही तर तिसरे प्रहरी जेव्हां पुरुष मंडळी बाहेर गेलेली असते, मुले खेळण्यांत गुंततात, व बायकांना फुरसत असते ती वेळ साधावी. ___श्रमपरिहाराचा उपाय—दळतांना गाणी' ह्मणण्याची चाल आहे. दळण्याचे श्रम जाणवू नयेत हा त्याचा उद्देश. ही गाणी १ नामदेव महाराजांची जनाबाई नांवाची एक कुणबीण असे. ती दळतांना श्रीकृष्णाचे गाणे अतिशय प्रेमळपणाने ह्मणे. तेव्हां भगवान् प्रसन्न होऊन तिला अ'नंदाने दळू लागत अशी एक कथा सांगतात. हिच्या काही ओंव्या पाठं करून ठेवण्या लायक आहेत. दळणाच्या दुसऱ्याही काही ओंव्या आहे. त्या या पहिली माझी ओंवी । ओंवीन जगत्र ____ गाइन पवित्र । पांडुरंग ॥ १ ॥ दुसरी माझी ओंवी । दुजें नाहीं कोठें जनीं वनीं भेटे । पांडुरंग ॥ २ ॥ तिसरी माझी ओंवी । तिला नाही ठाव - अवघाची देव । जनीं वनीं ॥ ३ ॥ चवथी माझी ओंवी । वैरिलें दळण गाईन निधान । पांडुरंग ॥ ४ ॥ पांचवी माझी ओंवी । माझिया माहेरा गाईन निरंतरा । पांडुरंग ॥ ५॥ साहावी माझी ओंवी । सहा ही आटले गुरुमूर्ति भेटले । पांडुरंग ॥ ६॥ सातवी माझी ओंवी । आठवे वेळोवेळां बैसलासे डोळां । पांडुरंग ॥ ७ ॥ ( पुढील पृष्ठावर चालू )