पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. inn ramawraxxxmaram साखर यांचा आणि शेजारतीचे वेळी आटीव दुधाचा नैवेद्य समर्पण करतात. मग काकड आरतीचे वेळी दोन काकडे आणि शेजारतीचे वेळी पांच काकडे घेऊन त्यांनी ओवाळतात. या आरतींचे सामान त्या त्या वेळी तयार ठेवावें.. पूजापात्र-अंगणांत तुळसीवृंदावन, औदुंबर, इ. ची पूजा करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य आटोपशीर राहील अशी पूजापाने मिळतात. त्यांना धरण्यास दांडा असून आंत पूजेचे निरनिराळे सामान ठेवण्यासाठी वाट्या असतात. या पूजापात्रांचा उपयोग तीर्थस्नानांत फार होतो. तीर्थावरून स्नान करून येतांना वाटेत अनेक देवळे आणि देवस्थाने लागतात. त्यांस नुसता नमस्कार करणे पुरे असते. पण बायका त्यांच्या नैसर्गिक उत्कट भक्तिभावामुळे देवाला 'पत्रं पुष्पं फलं तोयम् ' अर्पण केल्याशिवाय बहुधा राहत नाहीत. अशा वेळी पूजासाहित्य नेण्यास पूजापात्र फार सोयीचे असते. प्रकरण ११ वें. की दळणकांडण. ___ या प्रकरणाला दळणकांडण असें नांव दिले आहे. तरी वाटणे, कुटणे, खलणे, किसणे, कातरणे वगैरे अनेक क्रियांचा समावेश यांत करण्यांत येणार आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वी चांगल्या सुखवस्तु घरच्या बायका सुद्धां दळणकांडणाचे काम घरी करीत असत. त्यांत त्यांना कमीपणा वाटत नसे. अलीकडे दहावीस रुपये पगाराच्या कारकुनाच्या बायकोला सुद्धां दळणकांडण करण्याचे काम कमीपणाचे वाटते,