पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. ७५ mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm उपकरणी मळली असतील ती घासण्यास प्यावी. पाणी तुळसीला घालावे किंवा मोरी शिवाय इतर जागी टाकावें. आसनें गुंडाळून ठेवावी. पोथी, गोमुखी, जपमाळ, पाट, चौरंग वगैरे उचलून झाडून स्वच्छ करून जागचे जागी ठेवावें. पार्थिवपूजा-देवांची पूजा झाल्यावर कित्येक लोक पार्थिवपूजा करतात. पार्थिव ह्मणजे मातीची केलेली. मातीचें शिवलिंग हातावर तयार करून त्याची जी पूजा हातावरच करतात तिला पार्थिवपूजा ह्मणतात. पार्थिवासाठी माती घ्यावयाची ती शुद्ध जागेतली घ्यावी. तीतले खडे, रेती वगैरे वेंचून फेकून द्यावी, आणि पाण्यांत घट्ट भिजवून तिचा गोळा एखाद्या पाटीवर गोळा करून ठेवावा. पार्थिवाला माती दहा मासे वजनाहून अधिक असली पाहिजे व तिचे केलेले शिवलिंग किमानपक्षीं अंगुष्ठमात्र तरी पाहिजे. शाळुका शिवाय. सायंकाळची धुपारती-कित्येक घरी सायंकाळी निर्माल्य काढून देवांची पूजा फुलें वाहण्यापासून पुढे करण्याची चाल असते. ती. असेल तर तिचे साहित्य तयार ठेवावे. कांहीं मंदिरांतून संध्याकाळच्या धूपारतीचा मोठा थाट करतात.मथुरेस विश्रामघाटावर यमुनेची व अयोध्येतील रामाची धूपारती प्रेक्षणीय असते. पांचसहा मोठाली नीरांजने मिळून एक खूप जंगी पितळेचे नीरांजन हाती घेऊन त्याने देवाल! ओंवाळतात. या सर्व नीरांजनामिळून २५०३०० वाती असतात. काकड-आरती-हिला बोधआरती असेंही नांव आहे. ही प्रातःकाळी करतात. पंढरपुरची कांकडआरती प्रसिद्ध आहे. शयनआरती अथवा शेजारती ही रात्री देवाच्या निजण्याचे वेळी करतात. काकड-अरतीच्या वेळी कसला तरी लाडू किंवा लोणी व खडी