पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें. ७७ Animarana anamanrrrrrrrrrrrrrrrron. पांढरपेशा वर्गांत तरी ही कामें बहुधां मोलाने करून घेण्याची वहिवाट पडली आहे. याला स्त्रियांची वाढती शारीरिक दुर्बलता, ऐपतीच्या बाहेर दिमाखाने राहण्याची हौस, शिक्षणप्रसाराबरोबर येणारा शारीरिक कष्टाविषयींचा कंटाळा किंवा कार्यबाहुल्य अशी निरनिराळे लोक निरनिराळी कारणे देतात. त्या कारणांचा विचार येथे कर्तव्य नाही. कांहींहीं कारणे असली तरी ही कामें कशा रीतीने केली असतां चांगली होतील याविषयीची माहिती सुगृहिणीला अवश्य पाहिजे यांत शंका नाही. गरीब स्थितींतल्या बायकोला तरी दळून आणिलेल्या पिठाची भाकरी कशी करावी हे कळणे जितकें अवश्य आहे तितकेंच एखादे धान्य दळून त्याचे आपणांस पाहिजे तसे पीठ कसे करावे हे माहित असले पाहिजे व त्या कामांची संवय पाहिजे.मध्यम व श्रीमंत स्थितीतल्या बायकांनाही भाजणी, मेतकूट, तांदुळाची पिठी वगैरे पदार्थ घरचे घरी करण्याचे प्रसंग वारंवार येतात. सोंवळ्या बायकांचे तर त्यावांचून चालतच नाही. यासाठी दळणकांडणाची थोडी बहुत तरी संवय प्रत्येक स्त्रीला असणे अवश्य आहे. आरोग्याच्या व काटकसरीच्या दृष्टीनेही या अभ्यासापासून होणारे फायदे दाखवितां येतील. हातांत डंबेल्स घेऊन वेडेवाकडे अंगविक्षेप करण्यापेक्षां दळणकांडण, पाणी भरणे, वगैरे कामें केल्याने बायकांची प्रकृति अधिक चांगली राहते असा पुष्कळ लोकांचा अनुभवही आहे. दिवसेंदिवस जीवनकलह तीव्र होत चालला आहे. महागाई वाढत्या प्रमाणावर आहे, आणि दळणकांडणाची कामें मोलाने करणाऱ्या बायांचाही तुटवडा वाढत्या प्रमाणावर असल्यामुळे त्या या कामांबद्दल मजुरीही पुष्कळ मागतात. अशावेळी ही कामें गरीब स्थितींतल्या बायकांनी घरच्या