पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. mmmmm निर्माल्य-परवानगी असेल तर देव्हाऱ्यांतील व देवावरील निर्माल्य काढून देव पूजेच्या पाटावर काढून ठेवतात, आणि देव्हारा झाडून झटकून स्वच्छ करतात. देव्हारा केव्हां केव्हां धुऊन टाकणे चांगले. देवांची आयतने ह्मणजे तबकड्या, सिंहासने, प्रभावळी, छत्रचामरे, तसेच गाई, गंगेच्या लोट्या वगैरे दर एकादशीस व उत्सवाचे दिवशी घासावी. ही घासण्याची रीत मागे एका प्रकरणांत दिली आहे. निर्माल्य काढल्यावर तो हुंगून एका टोपलीत टाकावा. त्यांतली चांगली फुले, हार, गजरे वगैरे प्रसाद ह्मणून उपयोगांत आणण्यास हरकत नाही. मात्र ते पायाखाली येतां उपयोगी नाही. आवरसावर--पूजा आटोपल्यावर दक्षिणा आणि तांबूल उपाध्येबुवा असल्यास त्यांस, नसल्यास एखाद्या ब्राह्मणाला द्यावी. फळे व नैवेद्य घरच्या मंडळीस घेण्यास हरकत नाही. -नीरांजनांतील वात जळू द्यावी, अगर मालवावी. मात्र त्याचा दुर्गंध देवाकडे जाऊ देऊ नये. निर्माल्याने नीरांजन पुसावें. उदबत्ती जळत असेल तर ती भिंतीस टोचून ठेवावी अगर पाण्याचा थेंब टोकावर टाकून विझवावी. उरलेले गंध गोळी करून ठेवावें. उपकरणी कोरडी करून डब्यांत अगर संबळींत भरून ठेवावी. जी १ अल्पवयी स्त्रियांना देवांना शिवण्याची बहुधा परवानगी नसते. शालिग्रामाला तर स्त्रियांनी मुळींच स्पर्श करूं नये. आयतनें व गाईच्या मूर्ति वगैरेंना शिवण्यास हरकत नाही. २ कित्येक स्त्रिया निर्मात्यांतली चांगली फुलें, गजरे वगैरे वेणीत खोंचतान पुरुष पागोट्यांत घालतात. मात्र तसे करण्यापूर्वी त्यांत विंचू वगैरे जीव. जंतु लपून बसले नाहीतना हे नीट पाहावें.