पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. चालली असल्यामुळे बहुधा नवरा, बायको व मुलें येवढीच माणसें पुष्कळ कुटुंबांतून आढळतात. घरांत वडील व पोक्त अशी माणसे असलेली कुटुंबे फार थोडी सांपडतील. बरें, गृहिणीने घरांतल्या कामांची व्यवस्था पहावी, तर या अवघड कामाला अवश्य शिक्षण तरी तिला कोठे मिळते ? हल्ली स्त्रीशिक्षण वाढत्या प्रमाणावर आहे खरे, पण त्या स्त्रीशिक्षणांत गृहव्यस्थेला महत्त्वाचे स्थळ मिळालेले दिसत नाही. घरांत सांगण्यास वडील माणूस नाही, आणि शाळेतूनही ते शिक्षण मिळालेले नाही, अशा स्थितीत गृहिणीला घरकामाची नीट व्यवस्था ठेवता आली नाही तर त्यांत तिच्याकडे तरी काय बोल आहे ? सारांश काय, तर सध्याच्या गृहिणींच्या हातून घरकामें व्हावी तशी होत नाहीत ही गोष्ट जरी खरी आहे, तरी त्याबद्दलचा दोष त्यांच्याकडे नाही. तो परिस्थितीच्या व शिक्षणपद्धतीचा दोष आहे, आणि हा दोष काढून टाकल्याशिवाय आपली नुसती राजकीय किंवा सांपत्तिक स्थिति सुधारल्याने आपण ज्यास्त सुखी होऊ अशी आशा करणे हे मृगतृष्णेप्रमाणे निष्फळ आहे. अशा स्थितीत गृहिणींना त्यांची गृहसंबंधी कृत्ये कशी करावी त्याचे ज्ञान पुस्तकावरूनच करून घेणे भाग आहे. वडीलमाणसांच्या प्रत्यक्ष उदाहरणापासून मिळणाऱ्या शिक्षणाची सर पुस्तकापा'सून मिळणाऱ्या ज्ञानास येणार नाही हे प्रस्तुत लेखकांसही कबूल आहे; तरी 'अकरणान्मंदकरणं श्रेयः ' या न्यायाने या गोष्टीचा विचार करतां प्रस्तुत पुस्तकापासून गृहिणींना थोडा बहुत तरी लाभ करून घेता येईल अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही. गृहिणी अगर घरधनीण घरांतल्या कामांवर नजर ठेवील तेवढी थोडीच आहे, आणि घरांतलीं बारीकसारीक कामें कांहीं थोडी थोडकी