पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. ७३ www स्नान घालतात. अभ्यंगस्नानाचे दिवशीं ऊन पाण्याने स्नान घातले पाहिजे. कित्येक विशेष भक्तिमान् आणि ऐपतदार लोक रोज देवाला स्नान घालतांना त्याच्या अंगाला अत्तर लावतात. पण असे लोक फार कचित्. परिमलद्रव्यें-- ह्मणजे सुगंधिपदार्थ असा अर्थ आहे. सुवासिक अत्तरें, बुका, पुष्पपराग इ. परिमल द्रव्ये होत. ही देवाला वाहण्यासाठी पूजेच्या साहित्यांत ठेवावी. कित्येक लोक या परिमलद्रव्याचे एक्जी ज्याला बिलकुल सुवास नाही असे जिन्नस ह्मणजे हळदकुंकु, गुलाल, शेंदूर, इ. पदार्थ परिमल द्रव्ये ह्मणून वाहतात ! हळदकुंकु देवीला वाहिलेच पाहिजे. शेंदूर गणपति व मारुती यांना ही ते प्रिय आहे.देवांना वाहण्याचे हळदकुंकवाचा करंडा वस्तुतः निराळा ठेविला पाहिजे. पण याच करड्यांतून सुवासिनींना हळदकुंकू लावण्याची चाल पडली आहे. विडादाक्षिणा---विडा लावून किंवा नुसती विड्याची दोन पाने आणि सगळी सुपारी देवाला तांबूल ह्मणून देण्यासाठी पूजा करणाराचे पुढे पानाची अग्रे करून उजव्या हाताला ठेवावी. विडा लावलेला असला तर फोडलेली अगर कातरलेली सुपारी त्यांत घालावी; पण नुसती सुटी पानेच ठेवावयाची असली तर मात्र सबंध सुपारी पाहिजे. दक्षिणा इच्छेप्रमाणे एक पैशापासून हवी तेवढी ज्यास्त ठेवता येते. पैसाहून कमी मात्र ठेवीत नाहीत. फळासाठी एकेक बदाम, एक खारीक, शक्ति असल्यास एक नारळ, आंबा, केळे, पेरू इ. ठेवतात. बदाम व खारीक विड्याच्या सुट्या पानांवर ठेवितात. इतर फळे विड्याच्या शेजारी किंवा खाली ताटांत ठेवितात. विडा व फळे रोजच्या पूजेला ठेवणारे लोक थोडे. नैमित्तिक पूजेला मात्र ती अवश्य लागतात.