पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. ७२ wwwmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmar नैवेद्य-नैवेद्यासाठी आठचार दिवस पुरेल असें पंचखाद्य, साखर किंवा गूळ डबीत भरून ठेवावा. पंचखाद्यांत बदाम, खारीक, खोबरे, खडीसाखर आणि बेदाणा इतके जिन्नस येतात. मुलांना नैवेद्याच्या डबीतून खाऊ देऊ नये. निराळा द्यावा. नैवेद्यासाठी साखरेऐवजी खडीसाखर ठेवण्याचीही चाल आहे. पण बत्तासे मात्र ठेवीत नाहीत. कापर-जपानी आणि देशी असा दोन प्रकारचा कापूर बाजारांत मिळतो. जपानी कापराच्या अंमळ काळसर रंगाच्या लहान मोठ्या वड्या मिळतात.देशी कापूर पांढरा शुभ्र असून त्याच्या जाड ठेपी येतात. पूजेला कोणताही कापूर चालतो. त्याचा हरबऱ्यापासून चिंचोक्या येवढा पाहिजे तेवढा खडा हलकातीत काढून ठेवावा. पंचामत–दूध, दही, तूप, साखर, मध ( अथवा त्याचे ऐवजी गूळ ) यांच्या समुच्चयाला पंचामृत ह्मणतात. याचे ठरीव परिमाण नाही. ज्याने त्याने आपल्या इच्छेप्रमाणे व शक्तीप्रमाणे देवाला वाहावें. पंचामृतस्नान झाल्यावर शेष राहिलेल्या पदार्थांचा देवाला नैवेद्य समर्पण करतात, व स्नान घातलेले पंचामृतमिश्रित पाणी तीर्थ ह्मणून घेतात. - अभ्यंगस्नान-ह्मणजे सुवासिक तेल वगैरे लावून स्नान करणे. काही विशेष प्रसंगी व नैमित्तिक पूजेच्या वेळी देवाला अभ्यंगस्नान घालतात. रोजच्या पूजेच्या वेळी अभ्यंगस्नान घालणारे फार थोडे. देवाच्या अभ्यंगस्नानासाठी लहानशा वाटीत सुवासिक तेल घेतात, किंवा थोडासा कापूस तेलांत भिजवून पूजासाहित्यांत ठेवतात. एखाद्या फुलाला तेलांत बुडवून ते फूल स्नानाचे वेळी देवाच्या अंगाला लावण्याचीही चाल आहे. तेल लाविल्यानंतर ऊन पाण्याने देवाला