पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. ७१ rvarnwarwwwwwwwwwwwwwwwwmmmmmmmmm wwwwwwwwww काढली. या काड्यांना उदबत्त्या ह्मणतात. पण त्या उदाच्या कचित्च करतात. अगरू नांवाच्या चंदनाच्या काड्या करतात त्यांना अगरबत्त्या ह्मणतात. कस्तुरी, शिलाजतु वगैरे सुगंधि द्रव्ये घालून केलेल्या काड्यांना चांगला सुवास असतो. पण साधारण उदबत्त्या उदेल किंवा मसाल्याचे तेल काढल्यावर जो गाळ राहतो त्याच्या करतात. ज्या उदबत्तींत कोळशाचा भाग अधिक असतो ती वाईट. उदबत्तीच्या दोन पेठा प्रसिद्ध आहेत. एक पंढरपूर व दुसरी मैसूर. पंढरपूरची उदबत्ती जाड असते. मैसूरची बारीक, लांब व पिवळ्या रंगाची असते. उदबत्त्या करण्यांतही कित्येक व्यापारी लबाडी करतात. उदबत्तीला वरून चांगल्या वासाचा हात मारतात, व तिच्या दोन्ही तोंडांना चांगला मसाला लावून मध्ये कशी तरी भरती करतात. शिवाय काड्या जाड करून मसाला थोडा लावतात. या . दीप--पूजेला सामान्यतः फुलवात प्रशस्त आहे. साध्या वातीबद्दल तेलवातीच्या प्रकरणांत सांगितले आहे ते पहावे. काडवात, रुद्रवात, बेलवात वगैरे वातीचे काही प्रकार प्रसिद्ध आहेत. त्याबद्दल निराळ्या ठिकाणी सांगण्यात येईल. येथे फक्त फुलवातीविषयी थोडे सांगतो. या चांगला कापूस आणून घरी त्यांतली सरकी काढून तो साफ करावा. फुलवातीची तळी चांगली पसरट आणि जाड गादीची करावी. तिचा दांडा उंच, जाड व पीळदार असावा. अशा वाती फुरसतीने एकदम आठपंधरा दिवसांच्या बेगमीच्या करून त्या तुपांत भिजवाव्या, आणि तूप थिजले झणजे डबीत भराव्या. उन्हाळ्यांत वातीत तूप फार ठेवू नये. नाही तर ते डबींतून पाझरेल.