पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० घरांतली कामें. marna तात. २१-२१ ची एकेक जुडी अशा २१ जुड्याही वाहतात. दूर्वा पाण्यात घालून ठेवण्याने टवटवीत राहतात. नवरात्रांत ह्मणजे आश्विन शु० ५ चे दिवशी ललितादेवीचा पूजा असते. ज्या सवाष्णीला कुंकवाच्या डबीचें झांकण कोठेही एखादे वेळी सांपडते, तेव्हां ती तें शुभचिन्ह मानून ललितादेवीच्या पूजेचे व्रत घेते. पण ही पूजा पुरुष करतात हे विशेष आहे. सांपडलेलें कुंकवाच्या डबीचे झांकणासारखें चांदीचे झांकण करून ते देवांत ठेवितात व ललितापंचमीला या टाकाची पूजा करतात. या पूजेला १२१ दूर्वांची एकेक अशा १२१ जुड्या लागतात. पूजेच्या वेळेपर्यंत फुलें व तुळसी वाळू नयेत ह्मणून ती त्या बेतालाच पुड्यांतून काढावी. अगोदर काढली तर त्यांवर थोडे पाणी शिंपडन ओलें फडकें त्यांच्यावर झांकण घालावें. पारिजातक किंवा जाई यांसारख्या नाजुक फुलांच्या पाकळ्या पाण्याने गळतात हे लक्षात ठेवावें. फलें फार पाण्याने तरीन झालेली देवाला वाहिल्यास त्या पाण्याने देवाचे अंग भिजते व त्यांस नेसविलेल्या वस्त्रावर डाग पडतात. ह्मणून फुलांवर पाणी शिंपडावयाचें तें बेताने शिंपडावें. धप-ऊद हा धुपास चांगला. ऊद हा एक प्रकारचा झाडाचा चीक आहे. उदाचा धूप सौम्य असतो. लोभानाला उग्र वास असतो. यणन तो विशेषेकरून उग्र देवतांपुढे जाळतात. दशांगधूप नांवाचा एक धूप आहे. त्यांत रंगारी हिरडे, राळ, जटामांसी, गुगुळ, चंदन, लाख, शिलाजतु, कापूर, नखला, व कुष्ट अशी दहा द्रव्ये असतात. पण हा धूप करण्याची खटपट फारशी कोणी करीत नाही. उदबत्ती-धूप वरचेवर घालण्याची उपाधि टाळावी ह्मणून काड्यांना ओलेपणी धूप लपेटून उदबत्त्या करण्याची युक्ति कोणी