पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. mmmmmmmm असणे फार चांगले असें ह्मणतात. या दृष्टीने तरी तुळसीचे रोप घरांत असणे अवश्य आहे. तुळस काळी व हिरवी अशा दोन जातींची असते. त्यांतली काळी तुळस विष्णूला अधिक प्रिय आहे असे समजतात. तुळसीचें पान व मंजरी यांची योग्यता सारखीच समजतात. पूजेला तुळसीची अवश्यकता असल्यामुळे तोडल्यापासून सहा दिवसपर्यंत तिची पाने व मंजरी शिळी समजत नाहीत. एकदां वाहिलेली तुळसीची पाने प्रोक्षण करून सहा दिवस पुनः वाहतां येतात. बायकांनी तुळसीची पाने वगैरे तोडूं नयेत असा नियम आहे. ह्मणून गरज लागल्यास बायका ती मुलांमाणसांकडून तोडवितात. वैधृति, व्यतिपात, मंगळवार, रविवार, द्वादशी, व सुतकसोयेराचे दिवस या दिवशी तुळसी तोडूं नयेत. बिल्वपत्र-जशी तुळसीची पाने विष्णूच्या पूजेला, तसें बिल्वपत्र महादेवाच्या पूजेला अवश्य आहे. त्याच्या प्रत्येक पत्राला तीन दळे (पानें ) असली पाहिजेत. कमी उपयोगाची नाहीत. बेल तुळसी इतका सुलभ नाही, ह्मणून त्याची शिळा होण्याची कालमर्यादा तीस दिवसांची ठेवलेली आहे. दूर्वा-या गणपतीला फार प्रिय आहेत. कित्येक इतर देवतांनाही त्या वाहतात. दूर्वा बहुधा मुळांसकट वाहतात. पण गणपतीच्या नित्य पूजेला मुळांसकट दूर्वा कदाचित् मिळणार नाहीत, ह्मणून त्यांचे तुरे खुडून वाहिले तरी चालतात. हे तुरे त्याच्या कांड्यापासून वर तीन पानांहून कमी संख्येचे उपयोगी नाहींत. एकाच कांडावर ज्यास्त पाने फुटलेली चालतात. दूर्वा बहुधा एकवीस वाह