पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. wwwwwwwwwwwwwwwwwwwwwmmmmmmmmmmmm द्याच्या बागेतून त्याच्या न कळत आणलेली किंवा कुठल्या तरी जागेवरची काढून आणलेली फुलें निषिद्ध होत. फुळे नेसलेल्या वस्त्राच्या पदरांत किंवा घोळांत घालून आणूं नयेत. तसेच पाय लागलेली किंवा वास घेतलेली फुलें देवाला वाहूं नयेत. एकदां देवाला वाहिलेली फुलें पुनः वाहण्यासाठी घेऊ नयेत. फुलांवर पाणी शिंपडून त्यांतली निरुपयोगी, किडकी, छिद्र पडलेली, पाकळ्या गळालेली, मातीत मळलेली, सुकलेली अशी फुलें काढून टाकून चांगली तेवढी घ्यावी. कच्च्या कळ्या देवाला वाहत नाहीत. गंधहीन, आकाराने फार मोठी व वजनदार अशी फुलें देव्हाज्याच्या शोभेच्या मात्र उपयोगी असतात. फुलें निवडून काढल्यावर त्यांची जातवारी लावावी. कारण, कांहीं जातीची फुलें देवांना वाहण्याची नसतात, व कांही विशेष प्रियकर असतात. जसे--मुकुंदाला कंदाची फुले, महादेवाला केवडा व गणपतीला तुळसी वाहत नाहीत. जाई, जुई, मोगरा यांसारखी कोमल व सुवासिक फुलें पुष्कळ असली तर त्यांचे गुच्छ, गजरे, किंवा हार देवासाठी वेळ मिळेल तेव्हां गुंफून ठेवावे. टेवामध्ये शालिग्राम असला तर त्याच्या पूजेला तुळसी अवश्य पाहिजेत. वैष्णवांत तुळसीचे महात्म्य फारच आहे. त्यासाठी ते लोक तळसीचे बाग लावतात. ब्राह्मणांतला मोठा वर्ग पंचायतनाची पूजा करणारा आहे. पंचायतनांत शालिग्राम असावयाचाच. ह्मणून रोजच्या पजेच्या साहित्यांत तुळसीपत्रे लागतात. बायका तुळसीची सेवा करतात. ह्मणून घरांत तुळसीचे झाड असणे हे ब्राह्मणाच्या घराचे एक मख्य लक्षणच झटले पाहिजे. दिवसेंदिवस घरांत तुळस ठेवण्याचा प्रवात मोडत चालला आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुळसीचे झाड